डीकेटीई मध्ये इंटीग्रेटींग एआय अॅण्ड एमएल फॉर सस्टेनेबल इलेक्ट्रीक व्हेईकल डेव्हलपमेंट अॅण्ड स्मार्ट मोबॅलिटी विषयावार एफडीपी संपन्न
schedule17 Jan 26 person by visibility 59 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल विभागामध्ये दि. ५ ते १० जानेवारी २०२६ या कालावाधीत अटल फॅकल्टी डेवहलपमेंट पोग्रॅम (एफडीपी) डीकेटीई इलेक्ट्रीकल विभागामार्फत इंटीग्रेटींग एआय अॅण्ड एमएल फॉर सस्टेनेबल इलेक्ट्रीक व्हेईकल डेव्हलपमेंट अॅण्ड स्मार्ट मोबॅलिटी या विषयावर सहा दिवसाची ऑनलाईन एफडीपी यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती.
या एफडीपीसाठी देशभरातून २२५ सहभागाची नोंदणी झाली होती. या कार्यक्रमर्चीं कृत्रिम बुध्दिमता (एआय) व मशिन लर्निंग (एमएल) तंत्रज्ञानाचा शाश्वत विदयुत वाहन विकास व स्मार्ट मोबॅलिटी क्षेत्रातील सध्याची परिस्थीती, आव्हाने आणि भविष्यातील संधी यावर नामवंत तज्ञांकडून सखोल मार्गदर्शन व व्याख्याने देण्यात आली होती. या उपक्रमामुळे सहभागी अध्यापकांच्या संशोधन व अध्यापन कौशलयांना चालना मिळाली आहे.
अटल फॅकल्टी डेवहलपमेंट पोग्रॅम हा एआयसीटीई द्वारे राबविण्यात येणारा एक राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण उपक्रम आहे. या कार्यक्रमाचा उददेश अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन व संबंधित क्षेत्रातील प्राध्यापक, संशोधक आणि उदयोगतज्ञांचे कौशल्यविकास व ज्ञानवृध्दी करणे हा आहे. या अटल एफडीपी कार्यक्रमासाठी लागणारा सर्व खर्च एआयसीटीई तर्फे पूर्णतः प्रयोजित केला जातो. सदर कार्यक्रम हा संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, डायरेक्टर प्रा. डॉ. एल.एस. आडमुठे व इलेक्ट्रीकल विभागप्रमुख डॉ आर.एन.पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाला. या एफडीपीचे समन्वयक डॉ वैभव मगदूम, सह समन्वयक पी.एस.मगदूम यांनी काम पाहिले.