शैक्षणिक परिसंस्था विकसित करण्यासाठी आधुनिक साधनांची आवश्यकता: डॉ. चेतना सोनकांबळे
schedule17 Jan 26 person by visibility 51 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शैक्षणिक परिसंस्था विकसित करण्यासाठी आधुनिक साधनांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.चेतना प्र. सोनकांबळे यांनी काल (दि. १६) केले.
शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (पीएम.उषा) ‘ऑनलाईन अभ्यासक्रमाचे अध्यापनशास्त्र’ या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.
कार्यशाळेत पारंपरिक तसेच ऑनलाईन वर्गव्यवस्थापनासाठी आवश्यक सैध्दांतिक पार्श्वभूमी आणि प्रात्यक्षिकांवर आधारित व्याख्याने आयोजित करण्यात आली. यात सिम्बॉयसिस, पुणे येथील डॉ.अर्पिता कथाने, आयडिलायसर कन्टेन्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथील संस्थापक व संचालक डॉ पंकज कथाने, डॉ. डी. वाय पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कोल्हापूर येथील डॉ.सुरेश माने आणि तुळजाराम चतुरचंद कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, बारामती येथील डॉ.राहुल शहा या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. रुपाली संकपाळ असून म्हणून श्रध्दा तांडेल, डॉ. अंजली गायकवाड सहसमन्वयक आहेत. याप्रसंगी डॉ. विद्यानंद खंडागळे यांच्यासह अधिविभागातील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.