शक्तीपीठ महामार्गा विरोधातील शेतकऱ्याची आज ऑनलाईन राज्यव्यापी बैठक
schedule08 May 25 person by visibility 214 categoryराज्य

कोल्हापूर : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या गुरुवारी 08 मे रोजी सायंकाळी 07 वाजता राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात येणार आहे. 12 जिल्ह्यातील बाधीत शेतकरी या बैठकीत सहभागी होणार असून आहेत.
या ऑनलाईन बैठकीमध्ये आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी,आमदार कैलास पाटील, आमदार अरुण लाड, आमदार रोहित आर आर पाटील, लातूर ग्रामीणचे माजी आमदार नाना भिसे,परभणीचे किसान सभेचे अध्यक्ष राजन क्षीरसागर, माजी आमदार संजय बाबा घाटगे, उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, अमरीश घाटगे,
गोकुळ दुध संघाचे संचालक प्रकाश पाटील, भुदरगड कॉंग्रेस नेते राहूल देसाई, सम्राट मोरे (गारगोटी) , कृष्णात पाटील (साजणी), संपत देसाई, कॉ शिवाजी मगदूम, सुई वाडकर, सुदर्शन खोतआदी सहभागी होणार आहेत.