SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रिड इंधनावर : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावायश मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडा : डॉ. उदय साळुंखे; डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठात अभिवादनप्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारकेंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहितीजप्त केलेल्या स्थावर संपत्तीचा जाहीर लिलावशक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा : बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार : आमदार सतेज पाटीलकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण सुरुडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना; मायक्रेव्ह कन्सल्टंसी समवेत सामंजस्य करार

जाहिरात

 

यश मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडा : डॉ. उदय साळुंखे; डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात

schedule09 May 25 person by visibility 201 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : विद्यार्थ्यामधील चिकित्सक वृत्ती आणि नवकल्पना मांडण्याची क्षमता यामुळे संशोधन क्षेत्रात मोठे योगदान मिळत आहेत. ही संशोधनवृत्ती कायम जोपासा.  जीवनात यशस्वी होण्यासाठी कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा, असे आवाहन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबईचे ग्रुप डायरेक्टर डॉ. उदय साळुंखे यांनी केले. 

    डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या  राष्ट्रीय स्तरावरील इंटरकॉलेजिएट टेक्नो-मॅनेजमेंट स्पर्धा ‘टेक्नोलॉजिया- २०२५’ मध्ये प्रमुख अतिथी म्हणून  डॉ. उदय साळुंखे बोलत होते. डॉ. साळुंखे यांनी स्वतःच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी सांगितली. ते म्हणाले की, सातार्‍यासारख्या लहानशा गावातून मुंबईसारख्या महानगरात येणे सोपे नव्हते, पण चिकाटी व समर्पणामुळे आज या पदावर पोहचू शकलो. 

या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील तब्बल ७४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात आठ अनोख्या आणि स्पर्धात्मक कार्यक्रमांचा समावेश होता. ‘शार्क टॅंक’ स्पर्धेमध्ये डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूरने प्रथम क्रमांक पटकावला, तर न्यू कॉलेज, कोल्हापूर उपविजेता ठरले. ‘कोड शफल’मध्ये डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने विजेता तर केआयटी कॉलेज उपविजेता ठरले. डिबेट स्पर्धेत सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने प्रथम तर केआयटीने द्वितीय स्थान मिळवले. एक्सपांडेबल्स स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट विजेते  तर संजय घोडावत युनिव्हर्सिटी उपविजेते ठरले.

मिनी प्रोजेक्ट मध्ये न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूर विजेते तर डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी दुसऱ्या स्थानी राहिले. आय पी एल ऑक्शन स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटने पटकावला. बीजीएमआय स्पर्धेत आष्टा येथील अण्णासाहेब डांगे आयटीआय विजेते ठरले, तर डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटने दुसरा क्रमांक मिळवला. पी इ एस स्पर्धेचे विजेते न्यू पॉलिटेक्निक, कोल्हापूर तर उपविजेते डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ठरले.

प्रत्येक विजेत्या संघाला ६ हजार रुपये तर उपविजेत्यांना ३००० रुपये रोख, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात आले.
यावेळी कुलगुरू  डॉ. राकेश कुमार शर्मा, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी मार्गदर्शन केले. स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक  डॉ. अजित पाटील,यांनी स्पर्धेची सविस्तर माहिती दिली आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अभिजीत मटकर आणि प्रा. अनिकेत परदेशी यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी ‘टेक्नोलॉजिया- २०२५’ च्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes