कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठात अभिवादन
schedule09 May 25 person by visibility 150 categoryसामाजिक

कोल्हापूर : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आज त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विद्यापीठ प्रांगणातील भव्य पुतळ्यास पुष्प वाहून कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी मनोभावे अभिवादन केले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक तथा राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, भूगोल अधिविभागाचे डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. संभाजी शिंदे, डॉ. अण्णासाहेब गुरव यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.