कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण सुरु
schedule08 May 25 person by visibility 252 categoryक्रीडा

कोल्हापूर : शनिवार दि.10 मे 2025 पासून सकाळी व संध्याकाळी शुटिंगचे ट्रेनिंग प्रशिक्षण कोल्हापूर म्युनिसिपल कार्पोरेशन एअर रायफल ट्रेनिंग सेंटरमार्फत देण्यात येणार आहे. कोल्हापूर म्युनिसिपल कार्पोरेशन एअर रायफल ट्रेनिंग सेंटरची दुधाळी येथे शुटींग रेंज आहे. यामध्ये अत्याधुनिक ए.सी. वातांनुकूलित 10 मीटर शुटींग रेंज व 50 मीटर ओपन रेंज आहे. या दोन्ही ठिकाणी तंत्रशुध्द व शास्त्रयुक्त पध्दतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण महापालिकेच्या रेंजवरील प्रशिक्षकामार्फत देण्यात येणार आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांना 10 मीटर शुटींग रेंजसाठी दरमहा रु. 1600/- व 50 मीटर साठी रेंजसाठी रु. 1016/- शुल्क आहे. दुधाळी शुटिंग रेंज शहराच्या मध्यभागी व रंकाळा स्टँड जवळ असल्याने परगावातून येणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनिसाठी सोईचे आहे.
तरी इच्छुकांनी महानगरपालिकेतील दुधाळी शुटींग रेज येथील प्रशिक्षक अनुराधा खुडे मो.नं.9921690038 यांच्याशी अथवा जनसंपर्क अधिकारी मो.नं.9766532029 वर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.