पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी 12 जानेवाला प्रसिध्द
schedule09 Jan 26 person by visibility 82 categoryसामाजिक
कोल्हापूर : निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पुणे विभाग, पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषित केला आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरिता अनुक्रमे 18 व 19 नमुन्यात अर्ज सादर करावयाचे होते. या कार्यक्रमातंर्गत दिनांक 6 नोव्हेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या ऑफलाईन व ऑनलाईन अर्जावर अंतिम निर्णय घेऊन 3 डिसेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती. प्रसिध्द केलेल्या यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी 3 ते 18 डिसेंबर हा कालावधी देण्यात होता. त्यानुसार प्राप्त झालेल्या 12 हरकतीवर योग्य निर्णय घेऊन हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत. 7 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात पदवीधरसाठी 17 हजार 113 व शिक्षकसाठी 2 हजार 30 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्व अर्जावर 5 जानेवारी पर्यंत अंतिम निर्णय घेऊन अंतिम मतदार यादी तहसिल कार्यालय, सहा. मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच सन 2020 मधील निवडणुकावेळी पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी निश्चित करण्यात आलेल्या सर्व मतदान केंद्रावर (विनिर्दिष्ट ठिकाणी) दर्शनी भागात 12 जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
ज्या पात्र व्यक्तींनी अद्यापही पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज केले नाहीत. ज्यांची नावे अर्ज देऊनही काही तांत्रिक कारणास्तव अंतिम मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत अशा व्यक्तींनी निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी अर्ज करावेत
12 जानेवारी रोजी प्रसिध्द होणा-या अंतिम मतदार यादीचे सर्व राजकीय पक्षांनी व सर्व मतदारांनी बारकाईने निरीक्षण करुन आपली व आपल्या सबंधित व्यक्तींची नावे, सर्व मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत किंवा नाहीत याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदवीधर व शिक्षक मतदारसंघ पुणे विभाग पुणे यांनी केले.