भारतीय जनता पार्टीच्यावतीने गटनेता निवड प्रक्रिया पूर्ण
schedule23 Jan 26 person by visibility 89 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गटनेता या महत्त्वपूर्ण पदासाठी आज भाजपा जिल्हा कार्यालयामध्ये नवनिर्वाचित भाजपा नगरसेवकांची बैठक संपन्न झाली. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, प्राध्यापक जयंत पाटील यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
प्रदेश सचिव महेश जाधव यांनी सर्वांचे स्वागत करत आपल्या प्रस्ताविका मध्ये आजच्या महत्वपूर्ण बैठकीची रूपरेषा समजून सांगितली.
याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून जनसेवेच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहणे, आपल्या ऑफिसच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील समस्या सोडवणे सर्वांशी एक दिलाने वागून पक्ष विस्तार, पक्षाच्या वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगितले.
यानंतर गटनेता निवडी प्रक्रिया संदर्भात सर्व भाजपा नगरसेवकांनी कोऱ्या लिफाफ्यामधून गटनेता म्हणून आपली पसंती लिफाफा मध्ये बंद केली. सदर लिफाफे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या माध्यमातून प्रदेश कार्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत यानंतर मुंबई प्रदेशातूनच गटनेता नियुक्तीची घोषणा होणार आहे.
यानंतर कोअर कमिटीची बैठक जिल्हा कार्यालयात संपन्न झाली याठिकाणी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश महिला उपाध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हा सरचिणीस विराज चिखलीकर यांची उपस्थिती होती.