झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची हेमंत सोरेन यांनी घेतली शपथ
schedule28 Nov 24 person by visibility 186 categoryदेश
नवी दिल्ली : झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन आज (दि.२८) झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. राज्याचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
झारखंडची राजधानी रांचीमधील मारोबाडी मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिबू सोरेन, त्यांची पत्नी रुपी सोरेन, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, काँग्रेस नेते तारिक अन्वर, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन, आप नेते अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी इंडिया आघाडीतील नेते उपस्थित होते.
सोरेन यांचा राज्याचा झारखंडच्या इतिहासात चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे ते पहिले राजकीय नेते ठरले आहेत. नुकत्याच झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत सोरेन यांच्या नेतृत्त्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाखालील आघाडीला ८१ पैकी ५६ जागा मिळाल्या. तर भाजप प्रणित 'एनडीए' आघाडीला फक्त २४ जागांवर समाधान मानावे लागले.