हुपरीतील घरफोडी उघडकीस, दोघांना अटक, मुद्देमाल जप्त
schedule02 Dec 24 person by visibility 186 categoryगुन्हे
कोल्हापूर : दोन आरोपींना पकडून घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. 4,70,643 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
तपास पथकास गोपनीय माहिती मिळाली की, प्रमोद उर्फ पम्या विश्वास वडर व किरण मारुती जाधव दोघे रा. हुपरी, ता. हातकणंगले या दोघानी मिळुन हुपरी पोलीस ठाणेकडील गु.र.नं. 350/2024, बी एन एस 305 (A), 331 (3)4 प्रमाणे दाखल असलेला घरफोडी चोरीचा गुन्हा केला आहे.
मिळालेले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने दि.01.12.2024 रोजी प्रमोद उर्फ पम्या विश्वास वडर, वय 24, रा. गल्ली नं.02, वाळवेकरनगर हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर व किरण मारुती जाधव, वय 25, रा.घर नं. 31, शिवाजीनगर हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांना त्यांचे उपलब्ध पत्यावरून दि. 02.12.2024 रोजी ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल तपास करुन त्यांचेकडून 41.230 ग्रॅम वजनाचे सोन्याचे, 466.650 ग्रॅम चांदीचे दागीने व 44,700/- रु रोख रक्कम असा एकूण 3,70,643/- रु किंमतीची मुद्देमाल जप्त करून सदरचा घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
नमुद आरोपीकडुन हुपरी पोलीस ठाणे कडील गुन्हा उघडकीस आलेने त्यांचे कब्जात मिळालेले मुद्देमालासह त्यांना हुपरी पोलीस ठाणे येथे हजर केलेले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग, समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, हुपरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सरगर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, प्रसाद कोळपे, पोलीस अंमलदार युवराज पाटील, निवृत्ती माळी, सतिश जंगम, अमित सर्जे, संजय पडवळ, राजू कांबळे, महेंद्र कोरवी, राजेंद्र वरंडेकर, सुशिल पाटील व प्रभाकर कांबळे यांनी केली आहे.