SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजलीमहर्षी शिंदे यांच्याकडून अस्पृश्यतेच्या प्रश्नाची सैद्धांतिक मांडणी: संपत देसाई"वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रम डॉ. बापूजी साळुंखे इंजीनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहातराष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मेहबूब शेख नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ताराक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरणतात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मध्ये ‘इंडस्ट्री रेडी इंजिनिअर्स’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजनराधानगरी : कासारपुतळेतील जवान प्रमोद पाटील यांच्यावर अंत्यसंस्कारनागरिकांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती होण्यासाठी दुचाकी रॅलीचे आयोजन भारतीय भूचुंबकत्व संस्थेच्या सहकार्याने विद्यापीठात शुक्रवारी राष्ट्रीय कार्यशाळा; बदलत्या वातावरणाचा सखोल अभ्यास शक्यपर्व महिला सक्षमीकरणाचे...

जाहिरात

 

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य "सतेज कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तुफान तुडुंब गर्दी; प्रदर्शनाच्या तीन दिवसात ५ कोटीच्या आसपास उलाढाल

schedule29 Dec 24 person by visibility 277 categoryउद्योग

▪️उद्या सोमवारी शेवटचा दिवस, प्रदर्शनास भेट द्यावी आमदार सतेज पाटील यांचे आवाहन 

▪️१८ इंच बोकड आणि बाहुबली रेडा,५ किलो वजनाचा कोबी प्रदर्शनाचे ठरत आहेत खास आकर्षण पाहण्यासाठी रविवार सुट्टीचा दिवस असल्याने झाली होती तुडुंब गर्दी

कोल्हापूर : तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला आज तिसऱ्या दिवशी तरुण शेतकरी शालेय विद्यार्थी, शेतकऱ्यांनी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी तुडुंब गर्दी केली होती.तीन दिवसात उच्चांकी तांदळाची विक्री झाली आहे. महिलांनी खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून तीन दिवसात २५ लाखांची उलाढाल ही झाली आहे. शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे,व अवजारे यांची याठिकाणी नोंदणी ही शेतकऱ्यांनी केली आहे. तीन दिवसात ५ कोटींच्या आसपास उलाढाल झाली आहे.आजरा घनसाळ आणि आजरा इंद्रायणी तांदळाची  उच्चांकी विक्री झाली असून मागणी वाढत चालली आहे. आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने आणखी शेतकऱ्यांच्या तांदळाची विक्री होणार आहे.तरी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांनी भेट देण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.

 पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा "सतेज कृषी  प्रदर्शन चार दिवस आयोजन करण्यात आले आहे.२७ डिसेंबर  पासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाच्या आजच्या  तिसऱ्या दिवशी रविवार सुट्टी होती त्यामुळे लोकांनी व
कोल्हापूरसह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटक,इचलकरंजी,बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण  भागातील शेतकऱ्यांनी तुफान, तुडुंब गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी तपोवन मैदानावर केली होती.
       
 सोमवारी ३० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता प्रदर्शनाचा सांगता समारंभ होणार आहे. यावेळी आमदार सतेज पाटील, डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी.पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील,माजी  आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर यांची उपस्थिती असणार आहे"
       
सतेज कृषी प्रदर्शन यावर्षीचे प्रदर्शनाचे सहावे वर्ष असून अडीचशे हून अधिक स्टॉल, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यां सहभागी झाल्या आहेत.त्या कंपन्यांची उत्पादने, अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी  अवजारे, बी बियाणे, खते प्रदर्शनात  शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, विदेशी भाजीपाला, कोल्हापूर जिल्ह्यात पिकविण्यात आलेला भाजीपाला, विदेशी भाजीपला, फुले,
मातोश्री फार्म हाऊस गिरगाव फाटा येथील जितेंद्र पाटील यांचा चारदाती १२६० किलो वजनाचा मुऱ्हा जातीचा बाहुबली हा नामवंत रेडा या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे. शिवाय कागल येथील हैदर भाई फार्म अमेरीकन १८ इंचाचे बोकड, वर्षाला ३०० अंडी देणारी ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडी प्रदर्शनाचे ठरत आहे.याचबरोबर गडहिंग्लज येथील हसुरचंपू गावातील स्वप्निल पवार यांचा तेराशे १३६० किलो वजनाचा युवराज रेडा 


      याचबरोबर विदेशी भाजीपाला जुकेनिया काकडी, कागल येथील फुटबॉल आकाराचा पपई, नागदेववाडीतील २५ किलो वजनाचा केळी घड, सात किलोचा भोपळा,लांब पपई आणि पाच किलो वजनाचा भला मोठा कोबी, चिंचवाड शिरोळ येथील नागेंद्र घाटगे यांचा लाल कोबी,नांदणी शिरोळ येथील गेट्स फुल राशिवडे येथील जरबेरा फुले निशिगंध,बेले येथील ९७८ वान असलेला दोडका प्रदर्शनाचे ठरत आहेत.विदेशी भाजीपाला व स्थानिक भाजीपाला, चेरी टोमॅटो सुळकुड येथील एक किलोचे भरताचे वांगे बारवेक काळी वांगी,गडहिंग्लज येथील आनंदा  कानडे यांची कलर कॅप्सिकम रंगीत ढबु मिरची खास आकर्षण आहेत हे सर्व पाहण्यासाठी तपोवन मैदानावर तुफान गर्दी होत आहे.

  याचबरोबर फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन)  बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश  असल्याने याठिकाणी गर्दी ही लहान मुलांसह आबालवृद्ध आणि शेतकरी करत आहेत.प्रदर्शनामध्ये खाद्य महोत्सव भरविण्यात आला असून याठिकाणी कोल्हापूरकर आस्वाद घेत आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जात आहे.तर पाणलोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन,ठिबक सिंचन, गांडूळ खत युनिट,औषध फवारणी याचीही माहिती दिली जात आहे.गावरान कुकुट पालन कसे करावे यांचा स्टॉलही लावण्यात आला आहे.

प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव भरविण्यात आला असून तांदळाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी,हात सडीचा अशा नमुन्यांचा तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे.ज्याची विक्री ही प्रचंड होत आहे.शिवाय राधानगरी येथील घरगुती हळद,व अन्य शेतकरी यांची हळद,मसाले,सेंद्रिय गूळ नाचणी,उडीद, विविध फळे पेरू, मध, जाम, काजू, बदाम,विविध साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यांची खरेदी होत आहे.

 ▪️प्रदर्शनात अशी आहेत जनावरे
जनावरांमध्ये मसाई पठार येथील केदारलिंग देशी गोवंश गो शाळेतील सात वर्षाचा पैजासाठी वापर केला जाणारा सागर महाडिक यांचा वळू, काटेवाडी जातीचा शाहू घोडा जो पाच वर्षाचा आहे शंकर नावाचा ४३ महिन्याचा बेळगाव येथील आहे.दरडेवाडी तालुका आजरा येथील  सर्जा,आणि साहिवाल  कपिला गीर  गाय  जी चार वर्षे सहा महिन्याचे आहे, कोल्हापुरातील मंदार इंगवले यांचा क्राउड किंग नावाने परिचित असलेला कोल्हापूरकरांचा भुत्या हा घोडा जो आंघोळ घातल्यानंतर ओला झाल्यावर काळा दिसतो आणि वाळला की पांढरा दिसतो.शिवाय कागल मधील हैदर अली यांचा ब्रँड ब्रिडिंग फार्म मांडण्यात आली आहे.ज्यात पांढरे रंगीबेरंगी कबुतरे,ससे,मांजर,बदक,पांढरे उंदीर राजहंस,लवबर्ड,पोपट आदी जनावरे प्रदर्शनात आली आहेत जे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.


▪️श्री रासाईदेवी अँग्रो प्रोड्युसर कंपनी अंतर्गत  गावरान अंडी उत्पादन व्यवसाय करण्याची संधी दिली गेली आहे यात कंपनीकडून १ महिन्याची लसीकरण झालेली तलंग देणार आणि व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.*यात कावेरी आणि डीपी क्रॉस नावाच्या या कोंबड्या आहेत.

▪️भाजीपाला,फळे व फुलांचा समावेश

स्थानिक भाज्यासह विदेशी भाजीपाला पहावयास मिळत आहे.भाज्यांमध्ये सरबत फळ, कसबा नूल येथील राजगोंडा हबीगोंडे यांची एक फुटाची लाल मिरची युवराज कुंभार कुंभारवाडी राधानगरी यांचा यांचे बनकर फळ लाल कोबी बंडोपंत संकपाळ राहणार धनुरे कागल यांची बाजरी पांडुरंग गुरव यांचा लाल भोपळा लाल भोपळा,हळद, आदींसह विदेशी भाजीपालामध्ये सियसन  आरकरली, बेसिस,तर फुलांमध्ये राधानगरी येथील संजय ता यांचा जरबेरा,भडगाव येथील निशिंगध,जिप्सी फिलिया,औरचिड अशा फुलांचा  समावेश आहे.

याचबरोबर फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन)  बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश  असल्याने याठिकाणी गर्दी ही लहान मुलांसह आबालवृद्ध आणि शेतकरी करत आहेत.प्रदर्शनामध्ये खाद्य महोत्सव भरविण्यात आला असून याठिकाणी कोल्हापूरकर आस्वाद घेत आहेत.ताव मारत आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जात आहे.यात १२५ टन ऊस उत्पादकता, सुपर के नर्सरी टेक्निक, फनी डोळा दोन रुपयांपासून ३० पैशांपर्यंत  खर्च कमी करून तंत्रज्ञान करणारे विकसित हे डेमो दाखवण्यात आले आहे, राधानगरी कृषी विभागांतर्गत एकात्मिक कीड व्यवस्थापनवर डेमो तयार करण्यात आला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना अंतर्गत शेतकऱ्यांचा अपघात झाला तर त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा याबाबत डेमो लावण्यात आलेला आहे शिवाय शेतामध्ये फवारणी करत असताना कोणती काळजी घ्यावी हाही डेमो दाखविण्यात आलेला आहे. शिवाय शेती कशी करावी याची माहिती दिली जात आहे.याचबरोबर डी. वाय पाटील एज्युकेशन सोसायटी कृषी केंद्र अंतर्गत ऍग्रो वर प्रशिक्षण दिले जाते याचाही स्टॉल याठिकाणी लावण्यात आला आहे.

देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलीमर्स, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, संजय घोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व या प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, जिल्हा परिषद, पणन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खत व्यापारी, कोल्हापूर  संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत हे  कार्यरत आहेत. 

सतेज कृषी पशुपक्षी प्रदर्शनात पशुपक्षी दालन,  विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान, मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आली असून शेतकऱ्यांनी अजून एक दिवस चालणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी यावे असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी व संयोजकांनी केले आहे.

▪️अशा झाल्या आहेत स्पर्धा
प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्पस्पर्धा, खाद्य महोत्सव स्पर्धा,जनावरे गटनिहाय स्पर्धा या घेण्यात आल्या आहेत. याचबरोबर काही शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीने उत्कृष्ट शेतकऱ्यांची पशुस्पर्धांची निवड करण्यात आली आहे. त्यांना बक्षिसे आज होणाऱ्या समारोप समारंभात दिली जाणार आहेत.आज प्रदर्शन स्थळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट देऊन विविध उपकरणे,शेतीमाल पाहिला.आज तपोवन मैदानावर के. डी.सी अकॅडमी प्रस्तुत करवीर संध्या नृत्य नाट्य आणि धमाल मनोरंजनाचा कार्यक्रम झाला.

▪️व्याख्यान
 जैन इरिगेशम सिस्टीम जळगावचे कृषी तज्ञ सुरेश मगदूम ऊस पिकासाठी ठिबक सिंचन काळाची गरज या विषयावर माहिती दिली.

▪️सेंद्रिय गुळाला मागणी
प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात गुळाची विक्री झाली  सेंद्रिय गूळ खरेदी करण्यावर लोकांनी अधिक भर दिला  आहे.

▪️सतेज कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात तीन दिवसात विक्री झालेला शेतमाल : 
1) सेंद्रीय गूळ : ३००० kg
2) इंद्रायणी तांदूळ : ५५०० kg 
3) आजरा घनसाळ : ७८०० kg 
4) सेंद्रीय हळद : १३५० kg  
5) नाचणी : १२००kg
6)  विविध बी बियाणे  ६०० किलो

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes