भारतीय संविधान जगातील आदर्श संविधान : प्रा. डॉ. रविंद्र भणगे
schedule02 Dec 24 person by visibility 119 categoryराज्य
कोल्हापूर : संविधानातील स्वातंत्र,समता,बंधुता आणि न्याय मूल्यांमुळे भारतीय संविधान जगातील आदर्श संविधान आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक डॉ.रविंद्र भणगे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील राज्यशास्त्र विषयांतर्गत संविधान दिनाच्या निमित्त “भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल ” या विशेष ऑनलाईन व्याख्यानात ते प्रमुख वक्ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-संचालक डॉ.के.बी.पाटील होते.यावेळी उपकुलसचिव श्री.व्ही.बी.शिंदे उपस्थित होते.
प्रा.डॉ.भणगे म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत.भारतीय राज्यघटनेचे महत्व उद्देश पत्रिकेतून प्रतीत होते.भारतीय राज्यघटना लोकांनी लोकांसाठी तयार करून लोक सार्वभौमत्व असल्याने त्याची सुरुवात स्वतः पासून केली. या संविधानाला दि.२५ नोव्हेंबर १९४९ रोजी मान्यता मिळाली असून त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे महत्व सांगताना केलेले भाषण आजही प्रासंगिक आहे.संविधानाचे महत्व हे त्याची अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्ती किती प्रामाणिक आहेत यावर समजणार आहे. राष्ट्र निर्मिती आणि राष्ट्र बांधणी संविधानाच्या आधारेच होवू शकते.
संविधानाची अंमलबजावणी राज्यकर्त्या वर्गाकडे आहे.त्यांनी ती चागल्या पद्धतीने राबविल्यामुळे संविधानाचे महत्व गेल्या ७५ वर्षात अबाधित आहे.त्यामुळे भारतीय संविधानाकडे आदर्श संविधान म्हणून जग पाहत.आहे.
भारत भारत देशात सामाजिक,आर्थिक .राजकीय.सांस्कृतिक दृष्टीने विविधता आहे. परंतु त्यामध्ये एकता ठेवून संविधानाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल केलेली आहे.या देशामध्ये न्याय आणि समानतेवर आधारित नवनिर्मितीचे काम संविधानाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.आज भारत देशाने विकसित देशाच्या पंक्तीमध्ये स्थान मिळविलेले आहे.हे संविधानाच्या माध्यमातून झालेले आहे.
यावेळी प्रास्ताविक सहा.प्रा.डॉ.सचिन भोसले व स्वागत समन्वयक सहा.प्रा.डॉ.सुर्यकांत गायकवाड यांनी केले.पाहुण्यांचा परिचय सहा.प्रा.डॉ.नितीन रणदिवे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा.प्रवीण लोंढे यांनी केले. तर समन्वयक डॉ.सी.ए.बंडगर यांनी आभार मानले.