दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सांगली शहरात अपुरा पाणीपुरवठा, पाणीपुरवठा कार्यालयासमोर धरणे
schedule20 Oct 25 person by visibility 72 categoryसामाजिक

सांगली : ऐन दिवाळीतच सांगली शहरामध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. महापालिका प्रशासनाकडून शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यामुळे नागरिकांचे दिवाळीच्या पहिल्या दिवशीच मोठा खोळंबा झाला. दरम्यान पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस, भाजपच्या नगरसेवकांनी नागरीकांसह थेट महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयावर धडक देत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरले.
सांगली महापालिकेकडून शहरात करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. सणासुदीच्या दिवसात हा पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाणी आणण्यासाठी इतरत्र जावे लागत आहे.
संतप्त झालेल्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा कार्यालयाच्या दारातच हंडे आणि घागर घेऊन धरणे आंदोलन केले. यावेळी महापालिका आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच महापालिकेकडून शहरात पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने नागरिकांमध्ये महापालिकेच्या विरोधात रोष दिसून आला.