डीकेटीई राजवाडयामध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदीपोत्सव- संतवाणी मराठी गीतांचे‘ कार्यक्रमाचे आयोजन
schedule20 Oct 25 person by visibility 85 categoryसामाजिक

इचलकरंजी : डीकेटीईच्या राजवाडयामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी पाडव्यानिमित्त ‘ स्वरदीपोत्सव- संतवाणी ‘ हा खास मराठी गीतांचा कार्यक्रम बुधवार दि. २२ ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी ४.३० वा डीकेटीईच्या राजवाडयामध्ये आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम डीकेटीई, आपटे वाचन मंदीर व पं.बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर होणार आहे.
सदर कार्यक्रमात प.बाळकृष्ण बुवा मंडळ यांचे कलाकार व डीकेटीईचे वाद्यवृंदाचे विद्यार्थी संगीताची कला सादर करणार आहेत. कार्यक्रमानंतर राजवाडयावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई व फटाक्यांची अतिषबाजी देखील करण्यात येणार आहे.
तरी याचा लाभ संगीत श्रोत्यांनी घ्यावा व सदर कार्यक्रमास येताना पारंपरिक पोषाखात उपस्थित रहावे असे अवाहन संयोजकांनी केले आहे.