SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला 'अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय' दर्जास्व. अजितदादा पवार यांना गोकुळ तर्फे अभिवादनकंदलगाव हादरले! शेतवाडीत ४५ वर्षीय इसमाचा गळा आवळून निर्घृण खून; कोल्हापुरात खळबळकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वोत्कृष्ठ पुरस्कार जाहीरसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ. सचिन कांबळे यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकपेपर लीक प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी!डी. वाय. पाटील अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या ७२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवडसिंधुदुर्गातून ‘गोकुळ’चे एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्टदिल्लीतील विद्यार्थी लाठीमाराचा निषेध आणि अन्याय-अत्याचाराविरोधात उद्या महाराष्ट्र बंदजिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 6.85 टीएमसी पाणीसाठा

जाहिरात

 

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वोत्कृष्ठ पुरस्कार जाहीर

schedule22 Jul 26 person by visibility 136 categoryउद्योग

इचलकरंजी : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी दिलेले मोलाचे योगदान, उच्च दर्जाच्या साखरेच्या उत्पादनातील उत्कृष्ट कामगिरी तसेच उत्पादन व कार्यपद्धतीतील उल्लेखनीय कार्यक्षमता यांची दखल घेऊन दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या संस्थेने सर्वोत्कृष्ठ पुरस्कार जाहीर केलेला आहे.

19 ऑगस्ट रोजी गोवा येथे संस्थेच्या 84 व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था सन 1925 पासून साखर व संलग्न उद्योगांच्या विकासासाठी सल्ला, मार्गदर्शन, संशोधन व सहभागात्मक कार्यपध्दतीद्वारे कार्यरत असलेली देशातील सर्वोच्च व्यावसायिक संस्था आहे. देशातील साखर व संलग्न उत्पादनांची गुणवत्ता, उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी किफायतशीर व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी ही संस्था सातत्याने प्रयत्नशील असते. साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान देणारे उद्योगसमूह, व्यावसायिक, तज्ञ व संस्थांचा गौरव करण्यासाठी दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास मिळालेला हा पुरस्कार देशातील साखर उद्योगाच्या तांत्रिक प्रगतीस आणि कार्यक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्‍वास कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी व्यक्त केला. कारखान्यास मिळालेल्या पुरस्काराबद्दल कारखान्यास ऊस पुरवठा करणारे सभासद-शेतकरी, संचालक, ऊस तोडणी मजूर-वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी कामगार यांचा मोलाचा वाटा आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ संचालक प्रकाशआण्णा आवाडे आणि संचालक आमदार राहूल आवाडे यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes