कल्याण - डोंबिवली मनपाच्या परीक्षेत 100 मीटर आवारात इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यास बंदी
schedule09 Sep 25 person by visibility 212 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिका सरळसेवा पदभरती 2025 (टीसीएस कंपनीमार्फत) एकुण 21 संवर्गातील 490 पदांकरिता दि 9 ते 12 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन परीक्षेचे आयोजन केले आहे.
परिक्षेचे कामकाज सुयोग्य व कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्ह्यात lon Digital Zone IDZ Shiye, गट नं. 278, घर नं 1946, हनुमाननगर, कसबा बावडा ते शिये रस्ता, शिरोली एम.आय.डी.सी, मु.पो. शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात दि. 9 ते 12 सप्टेंबर या कालावधीत दररोज सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये मोबाईल फोन व त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास, वापरण्यास, झेरॉक्स / फॅक्स मशिन व लॅपटॉप यांचा वापर करण्यास अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी बंदी घातली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना, त्यांना नेमून दिलेल्या परिक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणासाठी लागू राहणार नाही.