SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचा पैसा परत करण्याबाबत कायदेशीर प्रकिया पूर्ण कराव्यातकोल्हापुरात वाहतूक शाखेतर्फे कर्तव्यदक्ष पोलिसांचा सत्कारमॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्जासाठी ‘महाडिबीटी’वर अर्ज प्रक्रिया सुरु; नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून जून-जुलै 2025 च्या 10 वी, 12 वी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्धशिवाजी विद्यापीठाच्या वतीने रायगडावर स्वच्छता मोहीम‘गोकुळ’च्या दुग्ध व्यवसायातील यशामुळे सहकार चळवळ सक्षम... : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापुरात बुलबुले कुटुंबियांची बेकायदेशीर पाळीव मांजरे जप्त; कारवाई दरम्यान मांजराने कर्मचाऱ्याचा घेतला चावा कोल्हापूर शहराला गुरुवारपासून पुर्ववत पाणी पुरवठा; महापालिकेच्यावतीने 21 टँकरद्वारे 63 फे-याकोल्हापूर शहरामध्ये 12524 नागरीकांची तपासणीटी २० सामन्यांसाठी मुंबई लीगचे सहप्रायोजक बनले संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल

जाहिरात

गुडाळ येथील स्वर्गीय इंदिरा पाटील दूध संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून स्वागत

schedule16 May 25 person by visibility 476 categoryराजकीय

कोल्हापूर  :  राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील स्वर्गीय इंदिरा पाटील सहकारी दूध संस्थेच्या पदाधिकार्‍यांसह काही ग्रामस्थांनी, आज कॉंग्रेसला रामराम करून, भाजपमध्ये प्रवेश केला. कोल्हापुरातील भाजप कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. सहकारी संस्था आणि गावच्या विकासासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली.

राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथल्या स्वर्गीय इंदिरा श्रीपतराव पाटील सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष आणि माजी प्राचार्य एस बी पाटील यांनी कॉंग्रेसची साथ सोडून, भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत सागर वागरे, युवराज पाटील, राहूल पाटील, दुलाजी पाटील, राजेंद्र मोहिते, बळवंत पाटील, कृष्णात पाटील, संजय पाटील, शामराव पाटील, दत्तात्रय पाटील, सौरभ सुतार,  दिनकर पाटील, ऋतुराज काटकर आणि निवृत्त नौदल अधिकारी आर बी पाटील यांनी, भाजपमध्ये प्रवेश केला.

 खासदार धनंजय महाडिक यांनी या सर्वांचे स्वागत केले. योग्य वेळी आपण भाजपमध्ये प्रवेश केला असून,  गावासह सहकारी संस्थांच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करू, तसेच भाजपमध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळेल, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली.

 यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, उपाध्यक्ष संभाजीराव आरडे, रवीश पाटील - कौलवकर यांनी मनोगतं व्यक्त केली. कार्यक्रमाला विजय महाडिक, प्रा. डी टी पुंगावकर यांच्यासह भाजपचे मंडल अध्यक्ष उपस्थित होते.

जाहिरात

Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes