कोल्हापूर : ॲटो रिक्षा चोरणारे दोन ताब्यात; २४ तासात चोरीचा गुन्हा उघड
schedule31 Oct 25 person by visibility 151 categoryगुन्हे
 
        कोल्हापूर : ॲटो रिक्षा चोरण्याऱ्या दोन चोरट्यांना ताब्यात घेवून २४ तासात चोरीचा गुन्हा उघड झाला. एकूण १,५५,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली
दिनांक २९/१०/२०२५ रोजी २०.०० वा. ते दिनांक ३०/१०/२०२५ रोजी ०८.०० वा. चे दरम्यान मुदतीत फिर्यादी महादेव परमान्ना पुजारी रा. सातबारा कॉलनी, गोकुळशिरगांव यांचे मालकीची दारात रोडवर लावलेली ॲटो रिक्षा नं. एम.एच.०९ CW २९९९ ही चोरून नेल्याबाबत फिर्यादी यांनी दिली फिर्यादीवरून गोकुळ शिरगांव पोलीस गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथकाने मोतीनगर चौक, राजेंद्रनगर, कोल्हापूर येथे जावून १) स्वप्निल आनंदा सोनाळे वय २५, रा. मसोबा माळवाडी, गोकुळ शिरगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर, २) मिलींद प्रताप शिवशरण वय १९, रा. आराम चौक, राजेंद्रनगर, कोल्हापूर यांना गुन्ह्यातील चोरलेल्या टीव्हीएस कंपनीची अॅटो रिक्षा नं. एम.एच.०९ सी डब्ल्यु २९९९ व गुन्ह्यात वापरलेल्या हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकलसह ताब्यात घेवून त्याचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी व त्यांचे इतर साथीदार ३) सुजल उर्फ पिल्या जयकर शिंदे रा. गोकुळ शिरगांव, ता. करवीर, ४) राज शिवाजी धामणेकर रा. रेणुका कॉलनी, ऊजळाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर, ५) चेतन कोंडीराम लोंढे रा. महादेव कॉलनी, राजेंद्रनगर, कोल्हापूर अशानी मिळून सदरचा गुन्हा केलेची कबुली दिली आहे. त्यानंतर त्यांचे माहितीने त्यांचे इतर साथीदारांचा शोध घेतला परंतू त्यांचे इतर साथीदार आरोपी मिळून आलेले नाहीत. आरोपी १) ) स्वप्निल आनंदा सोनाळे वय २५, रा. मसोबा माळवाडी, गोकुळ शिरगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर, २) मिलींद प्रताप शिवशरण वय १९, रा. आराम चौक, राजेंद्रनगर, कोल्हापूर यांचे कब्जातून गुन्ह्यातील चोरलेली १,२५,०००/-रूपये किंमतीची टीव्हीएस कंपनीची ॲटो रिक्षा नं. एम.एच.०९ सी डब्ल्यु २९९९ व गुन्ह्यात वापरलेल्या ३०,०००/-रूपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल एक असा एकूण १,५५,०००/-रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन दोन आरोपीना जप्त मुद्देमालासह गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार , अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार बच्चु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बरगे, शिवानंद मठपती, राजू कोरे, विशाल खराडे, प्रदीप पाटील, अमित मर्दाने, संजय हुंबे यांनी केली आहे.
 
                     
 
 
 
