SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन व ऑलिंपिकवीर कै.खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात (बॉडी-मास इंडेक्स) तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसादकोल्हापूर महानगरपालिका : पानलाईन व बाजारगेट परिसरातील दुकाना बाहेरील अनधिकृत 71 छपऱ्यांवर कारवाईडॉ. जयसिंगराव पवार यांचा कोल्हापूरचा इतिहास प्रकल्प महाराष्ट्रासाठी पथदर्शक : प्रा. रंगनाथ पठारेसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात कोल्हापूर महानगरपालिका : थकीत पाणी बिलातील विलंब आकरामध्ये 28 फेब्रुवारी अखेर 80 टक्के सवलतमहाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथ कोल्हापूर शहरानंतर पन्हाळा, वारणा, कागल व इचलकरंजी येथे जाणारतात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निकमध्ये "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन कार्यशाळासोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात नवोदितांनी सहभाग घ्यावा: डॉ. सुनीलकुमार सरनाईक; ९ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर येथे संमेलनकोल्हापूर महानगरपालिका : घरफाळा दंडामध्ये 28 फेब्रुवारी अखेर 80 टक्के सवलतमनी लाँड्रिंग प्रकरण : केजरीवाल, सिसोदिया यांच्याविरुद्ध खटला दाखल होणार, ईडीला गृह मंत्रालयाची मंजुरी

जाहिरात

 

तात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निकमध्ये "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन कार्यशाळा

schedule15 Jan 25 person by visibility 123 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांसाठी "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. पी. आर. पाटील आणि संस्थेचे मार्गदर्शक प्रा.डॉ. पी. एम. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या डिजिटल युगात वाचनाची सवय कमी होत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की मोबाईल, टीव्ही, आणि सोशल मीडियाच्या आहारी जाऊन वाचनाची आवड लोप पावत आहे. त्यामुळे साहित्य, माहिती, आणि वैचारिक विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. याच कारणामुळे वाचन सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम राबवला जात आहे. कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्यांसह सर्व शिक्षक आणि स्टाफ सदस्य उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. ए. बी. माने आणि प्रथम वर्ष अभियांत्रिकी लॅब असिस्टंट सुबोध कांबळे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

या कार्यशाळेत पॉलिटेक्निकमधील 244 विद्यार्थी सहभागी झाले होते. वारणा विविध उद्योग आणि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा आमदार डॉ. विनयरावजी कोरे, शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही.कर्जीनी यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन कार्यक्रमासाठी महत्त्वाचे ठरले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यात यश मिळाले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes