सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात नवोदितांनी सहभाग घ्यावा: डॉ. सुनीलकुमार सरनाईक; ९ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर येथे संमेलन
schedule15 Jan 25 person by visibility 182 categoryसामाजिक
कोल्हापूर : सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन अहिल्यानगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात शनिवार दि.९ व रविवार दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. अशी माहिती शब्दगंधचे समन्वयक डॉ. सुनीलकुमार सरनाईक, अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
नवोदितांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या २० वर्षापासून साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात, आज पर्यंत झालेल्या १५ साहित्य संमेलनामधून जवळपास ३०००० व्यक्ती सहभागी झालेल्या होत्या. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने होणाऱ्या सोळाव्या शब्दगंध साहित्य संमेलनात साहित्य दिंडी, उद्घाटन, सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र, काव्यसंमेलन, गझल सादरीकरण, कथाकथन, पारितोषिक वितरण व समारोप असा भरगच्च कार्यक्रम राहणार आहे. अशी माहिती शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
सर्व कार्यक्रमांमध्ये युवक, युवतीं तसेच महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने कथालेखन स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सामाजिक,साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रज्ञावंतांना पुरस्कारही देण्यात येणार आहेत.वाड:मय स्पर्धेकरिता ४७५पुस्तके होती, त्याचे परीक्षण समितीने केलेले आहे.दोन ज्येष्ठ साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या संमेलनात जास्तीत जास्त नवोदितांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे समन्वयक डॉ सुनीलकुमार सरनाईक, यांनी केले आहे.
यावेळी चंद्रसेन जाधव, रियाज मगदूम, शहाजहान मगदूम, धनंजय पाटील, तानाजी पोवार, प्रा.रंगराव पाटील, रमेश शाराव सरनाईक यांची उपस्थिती होती.