SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिका 'पथकर' आकारण्याच्या निर्णयावर उत्तम पाटील यांची नाराजीठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्तप्रलंबित बिलांमुळे ठेकेदार आर्थिक संकटात; राज्यभर एकाच वेळी आंदोलनाचा इशाराडी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये १२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया; ‘द स्पाईन फाऊंडेशन, मुंबई’च्या सहकार्याने उपक्रम एमपीएससी परीक्षा: कोल्हापुरात चोख बंदोबस्तात परीक्षा पारगाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड'गोकुळ' मार्फत डॉ.योगेश गोडबोले यांचा सत्कारअमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या तयारीचा चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला आढावाजागतिक रक्तदाता दिन: माणुसकीच्या रक्ताचे नाते!भाजपाच्या वतीने १५ जून रोजी कोल्हापुरात ‘सेवा अभियान’

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका 'पथकर' आकारण्याच्या निर्णयावर उत्तम पाटील यांची नाराजी

schedule14 Jun 26 person by visibility 136 categoryसामाजिक

कोल्हापूर :  शहरात येणाऱ्या काही विशिष्ट गाड्यांवर महानगरपालिकेकडून पथकर (टोल) लावण्याचा निर्णय प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. यावर आपचे कोल्हापूरचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी महानगरपालिकेने काही गंभीर बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, महानगरपालिकेची सध्याची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आणि इतर सोयीसुविधा पुरवण्यासाठी लागणाऱ्या निधीची कमतरता ही वास्तव परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत उत्पन्नाचा स्रोत वाढवणे गरजेचे असले तरी, पथकर आकारण्याचा निर्णय घेताना तो सर्वसामान्यांवर अतिरिक्त भार ठरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, जर इतर शहरांनीही अशाच पद्धतीने पथकर लावण्यास सुरुवात केली, तर या व्यवस्थेचे परिणाम काय होतील आणि ही प्रक्रिया कायदेशीर आहे का, याचाही सखोल विचार व्हायला हवा. पाटील यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, या निर्णयावर तातडीने अंमलबजावणी करण्याऐवजी, किमान १०-१५ दिवसांची मुदत द्यावी आणि या काळात नागरिकांकडून सूचना मागवून, साधक-बाधक चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा. यामुळे सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण होईल आणि महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीलाही आधार मिळेल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes