शेतकऱ्याचा मृत्यू
schedule30 Jun 24 person by visibility 271 categoryगुन्हे

कोल्हापूर : चुये (ता. करवीर) येथे डोक्यावरून भारा घेऊन शेतातून जात असताना बांधावरून पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मारुती आनंदा कांबळे (वय ५१) असे मृताचे नाव आहे.
रविवारी सकाळी नेहमी प्रमाणे मारुती कांबळे जनावरांना वैरण आणण्यासाठी शेतात गेले होते. भारा डोक्यावर घेऊन शेतातून बाहेर येत असताना, बांधावरून पाय घसरल्याने ते खाली कोसळले. भारा मानेवर पडल्याने बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी सी.पी.आर.मध्ये दाखल केले होते, पण डोक्याला जोराचा मार बसल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
मारुती हा घरचा कर्तापुरुष होता. मारुतीच्या मृत्युमुळे चुये गावावरती शोककळा पसरली आहे.