SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
करवीर तालुक्यातील तीन देवालयांना 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2026; अर्ज प्रक्रिया सुरूकणेरी ग्रामपंचायतमध्ये श्रमसंस्कार शिबिर उत्साहात शिरोळ येथे उद्या गुरुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनदख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळाके.एम.टी.चा 64 वा वर्धापन दिन उत्साहात साजराकोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; १.७९ कोटींचा मुद्देमाल जप्त, गोव्याहून येणारा दारूचा ट्रक पकडलाकोल्हापुरात स्वामी अभेदानंदजींची व्याख्यानमाला; 'गीतेतील भक्ती, शक्ती आणि मुक्ती' विषयावर होणार प्रबोधनएप्रिल फूल डे: हास्याचा उत्सवअश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त; बीएमसीला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त

जाहिरात

 

कणेरी ग्रामपंचायतमध्ये श्रमसंस्कार शिबिर उत्साहात

schedule01 Apr 26 person by visibility 102 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड, कोल्हापूर यांचे राष्ट्रीय सेवा योजना सन 2025-26 मधील विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर 23 ते 29 मार्च या कालावधीत ग्रामपंचायत कणेरी, ता. करवीर येथे संपन्न झाले. 

शिबिरामध्ये दोन सत्रामध्ये कामे करण्यात आली. पहिल्या सत्रामध्ये गावातील सार्वजनिक स्वरूपाची तांत्रिक कामे करण्यात आली.

 यामध्ये प्रामुख्याने रंगकाम, फॅब्रिकेशन, वेल्डिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिशन विद्युत दुरुस्ती व नवीन लाईट फिटिंग, वृक्षसंगोपन यासारखी समाज उपयोगी कामे श्रमदानातुन करण्यात आली.

तर दुसऱ्या सत्रामध्ये स्वयंसेवकांना करिअर मार्गदर्शन, रोजगार संधी, लघुउद्योग, शेतीपूरक व्यवसाय व त्यामध्ये येणाऱ्या समस्या, आरोग्य ही धनसंपदा, योग व योगाभ्यास यासारख्या विषयावरती मार्गदर्शन करण्यात आले.

  या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्राचार्य महेश आवटे यांनी तर तांत्रिक स्वरूपाच्या केलेल्या कामाबाबत काडसिद्धेश्वर स्वामींनी स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले.

 निशांत पाटील, लोकनियुक्त सरपंच व अंजना जाधव ग्रामसेवक यांनीही स्वंयसेवकांच्या कामाबद्दल कौतुक केले. सिद्धगिरी कारागीर महाकुंभ 31 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान सुरू होणार असुन सतरा राज्यांमधून राज्य - राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त दोनशेहून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमस्थळी स्वयंसेवकांनी केलेल्या तांत्रिक स्वरूपाच्या कामामुळे स्वयंसेवकांना उपस्थित राहण्याबाबत मठाकडून आमंत्रित केले गेले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes