SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीकेटीईमध्ये सीसीडब्ल्युसी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषद दिमाखात संपन्न - जागतिक संशोधनाला नवी दिशाकरवीर तालुक्यातील तीन देवालयांना 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2026; अर्ज प्रक्रिया सुरूकणेरी ग्रामपंचायतमध्ये श्रमसंस्कार शिबिर उत्साहात शिरोळ येथे उद्या गुरुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनदख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळाके.एम.टी.चा 64 वा वर्धापन दिन उत्साहात साजराकोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; १.७९ कोटींचा मुद्देमाल जप्त, गोव्याहून येणारा दारूचा ट्रक पकडलाकोल्हापुरात स्वामी अभेदानंदजींची व्याख्यानमाला; 'गीतेतील भक्ती, शक्ती आणि मुक्ती' विषयावर होणार प्रबोधनएप्रिल फूल डे: हास्याचा उत्सव

जाहिरात

 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा- 2026; अर्ज प्रक्रिया सुरू

schedule01 Apr 26 person by visibility 92 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-04 यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)-2026 रविवार, 21 जून  रोजी घेण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार शिक्षक पात्रता (TET) परीक्षा घेण्यात येत असून, इयत्ता 1 ली ते 5 वी (पेपर-1) तसेच 6 वी ते 8 वी (पेपर-२) साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक व शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

 परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी या संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. 

 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची 27 मार्च पासून सुरू झाली असून 16 एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी- 27 मार्च ते 16 एप्रिल पर्यंत, प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे- 9 ते 21 जून पर्यंत, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर -1 दिनांक व वेळ- रविवार, 21 जून सकाळी 10.30 ते 1 पर्यंत तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर -2 दिनांक व वेळ- रविवार, 21 जून दुपारी 2.30 ते 5 पर्यंत असणार आहे.
काही प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.

 परीक्षाक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती जिल्हा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर यशावकाश प्रसिध्द केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes