शिरोळ येथे उद्या गुरुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
schedule01 Apr 26 person by visibility 79 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यातील युवकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगक्षेत्र आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यांच्यात समन्वय साधण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर आणि खाशाबा जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दिनांक 2 एप्रिल रोजी स. 10 ते दु. 2 या वेळेत खाशाबा जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरोळ येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध प्रकारची सुमारे 190 पेक्षा जास्त रिक्तपदे या मेळाव्यामध्ये रिक्त आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा अभियांत्रिकी पदवी, आय.टी.आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युम सोबत आणणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले.