SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दऱ्याचे वडगाव इथल्या आपत्तीग्रस्तांना आमदार अमल महाडिक यांचा मदतीचा हात; स्वनिधीतून दिली मदतयेत्या मंगळवारी नोकरी इच्छूक महिला उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजनउत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - मुदतवाढकोल्हापूरात ‘संपूर्ण गीतरामायण’चा भव्य सोहळा : २३ ते २६ मार्च दरम्यान आयोजनकोरे अभियांत्रिकेत बौद्धिक संपदा हक्क जागरूकता विषयावरील कार्यशाळेचे आयोजनमाणगाव परिषद : सामाजिक क्रांतीचा एल्गारचिवचिव हरवलीय कुठे? : जागतिक चिमणी दिन आणि आपली जबाबदारीगुढीपाडव्यानिमित्त राज्यपालांनी उभारली गुढी‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ ही सौर क्रांती : पालकमंत्री प्रकाश आबिटकर‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची गुढी उंचच उंच जात राहो..’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

दऱ्याचे वडगाव इथल्या आपत्तीग्रस्तांना आमदार अमल महाडिक यांचा मदतीचा हात; स्वनिधीतून दिली मदत

schedule20 Mar 26 person by visibility 151 categoryसामाजिक

कोल्हापूर  : दोन दिवसांपूर्वी झालेल्या  अवकाळी पावसामुळे कोल्हापुरातील दऱ्याचे वडगाव इथल्या अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. आमदार अमल महाडिक यांना याची माहिती मिळताच त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आणि नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.

नुकसान झालेल्या बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून नुकसानग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला.

 त्यानुसार गुरुवारी आमदार अमल महाडिक यांनी सिमेंटचे पत्रे पाठवून दिले. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अस्मानी संकटाला तोंड देणाऱ्या ग्रामस्थांना या मदतीमुळे दिलासा मिळाला आहे.दऱ्याचे वडगाव येथे गावातील प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत नुकसानग्रस्त ग्रामस्थांना या पत्र्यांचे वाटप करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes