येत्या मंगळवारी नोकरी इच्छूक महिला उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
schedule20 Mar 26 person by visibility 118 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत मंगळवार, 24 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सी बिल्डींग, शासकीय निवासस्थान, विचारेमाळ, कावळा नाका येथे नोकरी इच्छुक महिला उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 2 खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारच्या सुमारे 40 पेक्षा जास्त रिक्तपदे या प्लेसमेंट ड्राईव्हकरिता कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 12 वी व कोणत्याही शाखेतील महिला पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या 3 प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.