कोल्हापुरात महायुती : भाजप 36, शिवसेना 30, राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा निश्चित
schedule29 Dec 25 person by visibility 52 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी महायुतीत जागावाटपावर एक मत झाले आहे . कोल्हापूरमध्ये भाजप 36 जागांवर निवडणूक लढवणार असून शिवसेना 30 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळाल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून बैठकांवर बैठका सुरू होत्या. अखेर आज सायंकाळी महायुतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जागा वाटपाची घोषणा केली.
कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फुट झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाने तिसऱ्या आघाडीसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रित निवडणूक लढवत आहे. यामध्येही काँग्रेसने 25 डिसेंबर रोजी 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. तर आज 29 डिसेंबर रोजी 14 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सहाजिकच आतापर्यंत सर्वाधिक 62 उमेदवार काँग्रेसने दिले आहेत.
तिसऱ्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि आम आदमी पक्ष आहे. साहजिकच कोल्हापूरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट दिसत असले तरी अपक्ष, बंडखोर उमेदवारांची संख्या ही अधिक असणार आहे.





