ग्राहक संरक्षणाबाबत विद्यापीठात विशेष व्याख्यान
schedule29 Dec 25 person by visibility 46 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : प्रत्येक नागरिकाने ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन दूर शिक्षण केंद्राच्या एम.बी.ए च्या सहा. प्राध्यापक सुप्रिया मोगले यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वाणिज्य विभागांतर्गत “ग्राहक संरक्षण कायदा : हक्क,जबाबदाऱ्या आणि जागरूकता” या विषयावर आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संचालक डॉ. कृष्णा पाटील होते.
यावेळी उपकुलसचिव विनय शिंदे,सहा. कुलसचिव दिलीप मोहाडीकर, समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर उपस्थित होते. श्रीमती मोगले म्हणाल्या की,नागरिकांनी ग्राहक संरक्षण कायद्याची पार्श्वभूमी समजावून घेतली पाहिजे. ग्राहकांचे मूलभूत हक्क, जबाबदारी, तक्रार निवारण यंत्रणा तसेच ऑनलाईन खरेदीदरम्यान घ्यावयाची दक्षता याविषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. कृष्णा पाटील म्हणाले,ग्राहक संरक्षण कायदा हा विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. डॉ. सुशांत माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.सचिन देठे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष देवेकर यांनी आभार मानले.





