शिवाजी विद्यापीठात हुतात्मा दिन
schedule30 Jan 26 person by visibility 119 categoryसामाजिक
कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवाजी विद्यापीठात हुतात्मा दिन पाळण्यात येऊन दोन मिनिटे मौन राखून अभिवादन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीच्या प्रांगणात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह अधिकारी आणि प्रशासकीय सेवकांनी सकाळी ठीक ११ वाजता दोन मिनिटे स्तब्धता पाळून महात्मा गांधी यांच्यासह हुतात्म्यांना अभिवादन केले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, संगणक केंद्राचे संचालक अभिजीत रेडेकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यापीठाच्या सर्व अधिविभागांत आणि प्रशासकीय विभागांमध्येही सर्व अधिविभाग प्रमुखांसह शिक्षक, सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी आपापल्या जागेवर उभे राहून हुतात्म्यांना अभिवादन केले.