डीकेटीईचे स्पोर्टसमध्ये सीओईपी, पुणे येथील झेस्ट २के२६ स्पर्धेत ८खेळांमध्ये घवघवीत यश
schedule30 Jan 26 person by visibility 115 categoryसामाजिक
इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टियूटच्या क्रिडा विभागाने सीओईपी, पुणे आयोजित झेस्ट २के२६ या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. डीकेटीईच्या संघाने तब्बल ८ विविध क्रिडा प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी करत संस्थेच्या क्रिडा परंपरेचा गौरव वाढविला आहे.
मिक्स क्रिकेट स्पर्धेत डीकेटीई संघाने यजमान सीओईपीच्या बलाढय संघावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. पुरुष कब्बडी संघाने अटितटीच्या अंतिम सामन्यात अवघ्या एका गुणाच्या फरकाने पराभव स्वीकारत द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच पुरुष कॅरम संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले.
वैयक्तीक क्रिडा प्रकारांमध्येही डीकेटीईच्या खेळाडूंनी आपली सरशी सिध्द केली. थाळीफेक, भालाफेक व १०० मी. धावणे या खेळामध्ये प्रथम क्रमांक तर गोळाफेक व आर्चरी या क्रिडाप्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. या दमदार कामगिरीमुळे डीकेटीईच्या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी डीकेटीईकडून वेळोवेळी प्रोत्साहन देण्यात येते यामुळेच येथील विद्यार्थी अशा स्पर्धेमध्ये विविध कला गुणांचे सादरीकरण करुण आपला ठसा अशा स्पर्धेमध्ये उमटवतात यामुळेच इचलकरंजी आणि डीकेटीईचे नांव अशा विविध स्पर्धेमध्ये सन्मानाने घेतले जाते.
विजयी खेळाडूंचे नांवे श्रावणी पवार, समृध्दी कुलकर्णी, ॠषि शहा, प्रविण अस्वले, शुभम कोकितकर, चंद्रशेखर कवटेकर, रितेष पटेकरी, संकेत पटेकरी, अनिकेत निर्मळ, प्रेम चव्हाण, जगदीश म्हारुणकर, कौशल घुणके, सुजल पाटील, अथर्व कोरे, सुशांत माने, श्रीनिवास माळी, श्रेयश पाटील, समर्थ कुंभण्णावर, सर्वेश चव्हाण,कुणाल माळी,श्रीनाथ भोसले,आयन कलावंत,मोईन तांबोळी,चिदेबेरी चिमसिमदी.
विजयी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त संचालिका प्रा. डॉ. एल.एस. आडमुठे, स्पोर्टस इनचार्ज ओंकार खानाज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.