महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन मंत्रालयाशेजारील उद्यानात सर्वधर्मीय प्रार्थना
schedule30 Jan 26 person by visibility 181 categoryराज्य
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयाशेजारील उद्यानात महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजलीही वाहण्यात आली.
यावेळी आमदार अमीन पटेल, नगरसेवक ज्ञानराज नाईक, नगरसेविका राजेश्वरी पाटणकर, महात्मा गांधी स्मारक समितीचे महासचिव देवरा सिंग, सचिव सुमन पवार, प्रा. अमर सिंग यांच्यासह कुलाबा म्युनिसिपल सेकंडरी स्कूलचे विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना झाली. मर्झबान वाडिया यांनी पारसी, ज्युलिस क्रेझर यांनी ख्रिश्चन, मौलाना मझरूल इस्लाम यांनी मुस्लिम, दीपक क्षीरसागर यांनी बौद्ध, सोहन सिंग यांनी शिख, केशव चंद्र प्रभू यांनी हिंदू तर भरत जैन यांनी जैन धर्माच्या प्रार्थनेचे वाचन केले.