NMMS परीक्षेची अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध
schedule29 Jan 26 person by visibility 78 categoryराज्य
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २८ डिसेंबर, २०२५ रोजी इयत्ता ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. ही अंतिम उत्तरसूची परिषदेकडील https://www.mscepune.in/ तसेच https://2026.mscenmms.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
या परीक्षेच्या MAT व SAT विषयांच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी/आक्षेप असल्यास ऑनलाईन निवेदन सादर करण्याबाबत 9 जानेवारी रोजीच्या प्रसिध्दी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. त्यानुसार 16 जानेवारी पर्यंत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन ही अंतिम उत्तरसूची तयार करण्यात आली आहे.
या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही पुढील निवेदन/आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत. तसेच परीक्षेसाठी गुणपडताळणी (Rechecking/Verification) केली जात नाही. याची नोंद मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी घ्यावी. या अंतिम उत्तरसूचीनुसार NMMS परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेकडील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे.