SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिक्रमणधारकांनो सावधान! तटाकडील तालीम ते महाद्वार रोडपर्यंत पालिकेची जोरदार धडक मोहीमसीबीएसई बोर्ड परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी RIMC प्रवेशपात्रता परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढजिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावाई-आर-1 विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत भरण्याचे आवाहनसेवा हक्क दिन आढावा बैठक संपन्नडी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये द्वितीयविरोधी पक्षनेते राजेश लाटकर व गटनेते इंद्रजित बोंद्रे यांचा कार्यालयीन प्रवेशप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात जागतिक आवाज दिवस: आपल्या संवाद शक्तीचा अनमोल वारसा

जाहिरात

 

अतिक्रमणधारकांनो सावधान! तटाकडील तालीम ते महाद्वार रोडपर्यंत पालिकेची जोरदार धडक मोहीम

schedule16 Apr 26 person by visibility 107 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज गुरुवारी तटाकडील तालीम चौक ते महाद्वार रोड परिसरात धडक कारवाई करत अनधिकृत विक्रेते आणि दुकानदारांना जोरदार दणका दिला. शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि रस्त्यावर पसरलेली अतिक्रमणे हटवण्यासाठी पालिकेने हे आक्रमक पाऊल उचलले आहे.

विभागीय कार्यालय क्रमांक २ आणि अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये १५ लाकडी टेबल, ११ पार्किंग जाळ्या, २० लोखंडी पाईप, ६ पुतळे, लोखंडी कॉट, छत्र्या, स्टॅन्ड बोर्ड, स्पीकर आणि रांगोळी बॅग यांसह इतर अनेक साहित्याचा समावेश आहे. महाद्वार रोड आणि ताराबाई रोड यांसारख्या गजबजलेल्या भागात ही कारवाई झाल्याने अनधिकृतपणे रस्ते व्यापणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.


महापौर रूपाराणी निकम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी काळात शहरातील अनधिकृत फेरीवाले आणि दुकानांच्या बाहेर काढलेल्या शेड्सवर आणखी तीव्र स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दुकानदारांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत, अन्यथा जप्तीची कारवाई सुरूच राहील, असे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes