SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वाशी येथे 'स्वामी क्लिनिक'चा भव्य शुभारंभ; माफक दरात मिळणार आरोग्य सेवाडी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्नस्ट्रक्चरल इंजिनिअर्सना आता हवी व्यावसायिक सुरक्षा; महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय बैठकीत ठरावनवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेस उत्साहात प्रारंभराज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन १०८८ पदांची भरती प्रक्रिया सुरूकोल्हापूर जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 4.89 टीएमसी पाणीसाठाआजचा फॅशन डे: स्वतःच्या शैलीचा नवा आविष्कारमहाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती​‘त्या’ घटनेने पेठवडगाव सुन्न: भरदिवसा, भररस्त्यात पत्नीचा बळी; आरोपी पतीच्या शोधात पोलीसपंचगंगा घाट व शाहू मिल परिसराची महापौर रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणी; आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

जाहिरात

 

स्ट्रक्चरल इंजिनिअर्सना आता हवी व्यावसायिक सुरक्षा; महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय बैठकीत ठराव

schedule09 Jul 26 person by visibility 147 categoryराज्य

कोल्हापूर : महाबळेश्वर येथे नुकतीच राज्यभरातील स्ट्रक्चरल इंजिनिअर्सची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत बांधकाम क्षेत्रातील स्ट्रक्चरल इंजिनिअर्सच्या समस्या, फीची सुसूत्र रचना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या व्यावसायिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

इमारतीची दुर्घटना घडल्यास कोणतीही तांत्रिक चौकशी न करता स्ट्रक्चरल इंजिनिअरला थेट जबाबदार धरले जाते, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे इंजिनिअर्सनी नमूद केले. डॉक्टरांच्या धर्तीवर, स्ट्रक्चरल इंजिनिअर्ससाठीही स्वतंत्र तांत्रिक समितीमार्फत चौकशी व्हावी आणि दोष सिद्ध झाल्याशिवाय गुन्हा दाखल करू नये, अशी कायदेशीर मागणी करण्यात आली. तसेच, इमारत बांधण्यापूर्वी मालकाने तिचा विमा काढणे बंधनकारक करावे आणि विम्याशिवाय महानगरपालिकेने बांधकामाला परवानगी देऊ नये, जेणेकरून भविष्यातील दुर्घटनेत नुकसान भरपाई मिळू शकेल, असेही सूचवण्यात आले.

बैठकीत फी संरचनेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, त्यानुसार सांगली-कोल्हापूरसारख्या शहरांसाठी १० रुपये प्रति चौरस फूट आणि पुणे-मुंबईसारख्या शहरांसाठी २० रुपये प्रति चौरस फूट फी निश्चित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इंडस्ट्रियल स्ट्रक्चर, पाण्याच्या टाक्या आणि विशेष स्ट्रक्चर्ससाठी यापेक्षा अधिक फी आकारली जाईल, तर किमान स्ट्रक्चरल डिझाइन फी ही एकूण स्ट्रक्चरल खर्चाच्या २% इतकी असेल. यासोबतच BOQ, DBR रिपोर्ट आणि साईट व्हिजिटसारख्या अतिरिक्त सेवांसाठी स्वतंत्रपणे शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इमारतीचे नियोजन आणि सौंदर्य आर्किटेक्ट करत असला, तरी इमारतीची मजबूती, टिकाऊपणा आणि सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी स्ट्रक्चरल इंजिनिअरची असते. भूकंप किंवा वादळासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये जीवितहानी कमी व्हावी यासाठी शास्त्रीय डिझाइन करणे हे त्यांचे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. मात्र, स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असंघटित असल्याने त्यांच्या तांत्रिक सेवेला आजही अत्यंत कमी मोबदला मिळत असल्याची खंत या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

या बैठकीचे नियोजन इंजि. प्रशांत हडकर, इंजि. नंदकुमार बने, इंजि. नारायण कोचक, इंजि. मंदार आंबेकर, इंजि. रणजीत जाधव, इंजि. स्मितेश शहा आणि इंजि. अमन मोमिन यांनी केले होते. यामध्ये सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सोलापूरसह राज्यभरातील विविध शहरांतील स्ट्रक्चरल इंजिनिअर्सनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes