न्यू इंग्लिश स्कूल कुरुकलीचे सहाय्यक शिक्षक बी. बी. देसाई यांचा सेवापूर्ती सन्मान, शुभेच्छा समारंभ उत्साहात
schedule26 Apr 25 person by visibility 350 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : न्यू इंग्लिश स्कूल कुरुकलीचे सहाय्यक शिक्षक बादशहा बापूसाहेब देसाई यांचा सेवापूर्ती सन्मान व शुभेच्छा समारंभ आज शनिवारी 26 एप्रिल रोजी सोनगे येथील पाटील मल्टीपर्पज हॉल येथे उत्साहात पार पडला. यावेळी बी. बी. देसाई यांचा जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष ॲड. विरेंद्रसिंह मंडलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष विरेंद्रसिंह मंडलिक यावेऴी म्हणाले की, बी. बी. देसाई सरांनी संस्थेच्या विविध शाळांमध्ये आपली सेवा दिली आहे. या शैक्षणिक संस्थेमध्ये स्व. सदाशिव मंडलिक साहेब, माजी खासदार संजय मंडलिक साहेब यांनी जे शिक्षक या सेवेमध्ये घेतले त्यांनी चांगल्या प्रकारे कार्य करून अनेक चांगले विद्यार्थी घडवले आहेत. आजही विद्यार्थी बाहेर या शिक्षकांचे नाव काढत असतात देसाई सरांना इतके सांगू इच्छितो की आज आपण शैक्षणिक सेवेतून निवृत्त झाला असाल, तरी सामाजिक क्षेत्रातून आपण कधीही सेवानिवृत्त होऊ नका. अशी विनंती त्यांनी केली. तसेच मंडलिक कुटुंब व शिक्षण संस्थेतर्फे त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर. डी .पाटील म्हणाले की शिक्षण क्षेत्रामध्ये मंडलिक साहेब यांनी हे लावलेलं रोपटे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये आज नेत्रदीपक कामगिरी करत आहेत.
सत्कारमूर्ती बी. बी. देसाई मनोगत व्यक्त करताना म्हणाले या संस्थेने मला नोकरी दिली नाही, तर एक आयुष्य दिले आहे. हे जे व्यासपीठ आहे हे माझं ज्ञान अनुभव आणि मूल्य यांचे विचार व्यक्त करण्याचे साधन ठरले. मंडलिक साहेब यांनी ही शैक्षणिक संस्था उभी केली त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि दूरदृष्टीमुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले. हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तसेच माझे विद्यार्थी माझ्यासाठी शिक्षक आहेत. तसेच माझ्या आयुष्यामध्ये माझ्या कुटुंबीयांची साथ महत्त्वाची आहे. आज मी सेवेतून निवृत्त होत असलो तरी ही शिक्षणाची नाळ मी तोडणार नाही . यावेळी विद्यार्थी, शिक्षक, व बी.बी. देसाई यांची कन्या सुमय्या देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अन्य मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी सदा साखरचे संचालक मारुती काळूगडे, ज्योतिर्लिंग पाणी वापर संस्था बेनिक्रे चेअरमन अण्णासो वाडकर, कुरुकली सरपंच मीनाक्षी कुंभार, माजी मुख्याध्यापक पी. व्ही. पाटील, उपसरपंच कुरुकलीचे उदय पाटील, कुरुकलीचे माजी सरपंच बी. आर. पाटील, बेनिक्रे माजी उपसरपंच वाय. आर. जाधव, माजी उपसरपंच बेनिक्रे यासीन देसाई, माजी मुख्याध्यापक एस. डी. मगदूम, कृषी उद्योग संघाचे संचालक अरुण पाटील, सौ दौलत देसाई, सोहेल देसाई, समीर देसाई, न्यू इंग्लिश स्कूल कुरुकलीचे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एस. डी. कांबळे यांनी केले तर आभार एम. बी. माने यांनी मानले.