शिवसेना महायुतीचे उमेदवार ओंकार जाधव विजयी गोल मारतील, मतदारांना विश्वास
schedule13 Jan 26 person by visibility 163 categoryराजकीय
कोल्हापूर : प्रभाग क्रमांक 13 मधील शिवसेना महायुतीचे उमेदवार ओंकार जाधव यांनी प्रचारामध्ये वेग घेतला असून ओंकार जाधव हे विजयी गोल मारतील असा विश्वास मतदारांकडून व्यक्त होत आहे. मतदारांशी वैयक्तिक संपर्कावर त्यांनी भर दिला असून प्रभागात मतदारांपर्यंत पोहोचून महायुतीचा जाहीरनामा पोहोचवला आहे. देशात, राज्य महायुतीचे सरकार असल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या सरकार आणण्यासाठी आपणास विजयी करावे असे आवाहन ओंकार जाधव यांनी केले आहे.
प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेना महायुतीचे उमेदवार ओंकार संभाजी जाधव, माधुरी शशिकांत व्हटकर, रेखा रामचंद्र उगवे, नियाज अरिफ खान हे निवडणूक लढवत असून सामूहिक प्रचार फेरी, कॉर्नर सभा, वैयक्तिक भेटीगाठी याद्वारे महायुतीच्या उमेदवारास मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होत आहे. शेवटच्या दिवशी ओंकार जाधव यांनी प्रभागातील विविध ठिकाणी घरोघरी जाऊन मतदारांशी भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी शुभम कोरडे म्हणाले ओंकार जाधव यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचारात वेग घेतला असून ते विजयाचा गोल नक्की मारतील, असा विश्वास व्यक्त करून प्रभागांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह सर्व स्तरातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.
या प्रचार फेरीमध्ये ओंकार चौगुले, वैभव सूर्यवंशी, आदर्श जीनगोंडा, ओंकार तिवले, मयूर पाटील, श्रेयस जाधव, यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

