ईद फेस्टीवलच्या वतीने सोमवारी इस्लामिक आरा या पुस्तकाचे मौलाना सलाउद्दीन सैफी यांचा हस्ते प्रकाशन, व्याख्यान
schedule26 Apr 25 person by visibility 318 categoryसामाजिक

कोल्हापूर : ईद फेस्टिवलच्या वतीने सोमवारी (28 एप्रिल) मुस्लिम बोर्डिंगमध्ये इस्लामिक आरा या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. भारतातील प्रख्यात इस्लामिक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, विचारवंत हजरत मौलाना सलाउद्दीन सैफी (खलिफा पीर जुल्फीकार साहेब) यांच्या हस्ते संध्याकाळी सात वाजता हा प्रकाशन सोहळा होणार आहे.
दमौलाना मुबीन यांच्या मार्गदर्शनानुसार हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. प्रकाशन सोहळ्यानंतर मौलाना सलाउद्दीन सैफी यांचे मुस्लिम बांधवासाठी अध्यात्मिक इस्लामिक व्याख्यान होणार आहे. विशेष प्रार्थना (दुवा) करण्यात येणार आहे
प्रमुख उपस्थिती मौलाना मन्सूर आलम कास्मी, मौलाना बशीर, मौलाना अब्दुल रॉफ, मौलाना इरफान कास्मी, हाफिज जावेद, हाफिज समीर उस्ताद, काझी आश्रफ, मौलाना अजहर, जाफरबाबा सैय्यद, आदिल फरास, हाजी अस्लम सैय्यद, हाजी कादर मलबारी हाफिज युनुस शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
मुस्लिम बांधवानी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन ईद फेस्टिवलचे संयोजक आणि मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर व मौलाना अब्दुल वाहिद सिद्दीकीएम. महमंद जीलानी शेख अ. रहीम महात सलीम शेख यांनी केले.