+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustराज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान adjustआ.पी.एन.पाटील यांची प्रकृती स्थिर; मान्यवर तसेच कार्यकर्त्यांनी तब्येतीबाबत घेतली माहिती adjustनगरोत्थानच्या रस्त्यावर पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईन कनेक्शनसाठी 3 दिवसांची मुदत adjustकोल्हापूर महानगरपालिका : नगरोत्थानमधील रस्त्यांच्या कामातील त्र्युटींमुळे अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता व जल अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस adjustपद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन adjustखासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र विश्‍वराज यांच्या विवाहनिमित्त झाला शाही स्वागत सोहळा adjustसंजय घोडावत इस्न्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाच्या दोन विद्यार्थ्यांची “इन्फ्रा मार्केट प्रायव्हेट लिमिटेड” कंपनीमध्ये निवड adjustकोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले, कारवर झाड कोसळले adjustसाई कार्डीयाक सेंटर हॉस्पीटलने जैव वैद्यकीय कचरा ॲटो टिप्परमध्ये टाकलेने पाच हजार दंड; मोरया, स्टार, जानकी हॉस्पीटल व ॲस्टर आधार हॉस्पीटलला दंडाची नोटीस adjustइराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन, मृतदेह सापडला
1000679152
SMP_news_Gokul_ghee
schedule11 Oct 22 person by visibility 1788 categoryसामाजिक
🟣 युटयुबवरील व्हिडीओ ब्लॉगमधून मिळालेल्या उत्पन्नातून अनोखा उपक्रम

कोल्हापूर : समाजाविषयी आस्था आणि दातृत्व असलेल्या कृष्णराज धनंजय महाडिक यांनी दसर्‍यादिवशी एक नवा अभिनव उपक्रम राबवला. गोरगरीब कुटुंबांना भेट देवून, त्यांना दसर्‍याचे सोने दिले. हे सोने म्हणजे केवळ आपटयाची पानं नव्हती, तर खरे सोने, साडी आणि मिठाई देवून त्या कुटुंबांना सुखद धक्का दिला. युटयुबवरील व्हिडीओ ब्लॉगमधून मिळणार्‍या उत्पन्नातून कृष्णराज महाडिक यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यावर्षी तर दसर्‍याला अस्सल सोने देवून त्यांनी आपल्यातील माणूसकी आणि बांधिलकी दाखवून दिली.

कृष्णराज धनंजय महाडिक हे नाव युटयुबवर सर्च केले, तर त्यांचे शेकडो व्हिडीओ ब्लॉग दिसून येतात. लाखो सबस्क्रायबर असणार्‍या कृष्णराज यांना युटयुबकडून मानाचे सिल्वर प्ले बटण हे ऍवॉर्डही मिळालंय. युटयुबकडून मिळणार्‍या उत्पन्नातून कृष्णराज महाडिक अनेक सामाजिक उपक्रम राबवतात. यावर्षी तर कृष्णराजनी राबवलेला उपक्रम एकमेवाद्वितीय म्हणावा लागेल. दसर्‍यादिवशी कृष्णराज महाडिक यांनी काही गोरगरीब नागरिकांना थेट त्यांच्या घरी जावून सोने दिले.

 कोणतीही ओळख किंवा कुणाचाही संदर्भ न घेता, जे कष्टकरी आणि गरीब दिसले, त्यांच्या घरी जावून कृष्णराज महाडिक यांनी त्यांना दसर्‍यानिमित्त शुभेच्छा आणि भेटवस्तू दिल्या. इतकेच नव्हे तर त्यांना प्रत्येकी एक ग्रॅम अस्सल सोन्याचे नाणे बहाल केले. विक्रमनगरमध्ये राहणार्‍या शोभा सुतार यांच्या घरी अचानक जावून कृष्णराजनी त्यांना साडी आणि सोने दिले. तर लक्षतिर्थ वसाहतमध्ये राहणार्‍या शकुंतला शिंदे यांनाही कृष्णराज महाडिक यांनी असाच सुखद धक्का दिला. कोणतीही ओळख नसताना, कृष्णराज महाडिक आपल्या घरी आले आणि दसर्‍याच्या सदिच्छा म्हणून खरोखरचे सोने दिले, यावर शिंदे परिवाराचा विश्‍वासच बसत नव्हता. भारावून गेलेल्या शिंदे परिवाराने महाडिक कुटुंबीयांचे शतशः आभार मानले.

 तर नाना पाटीलनगर मधील प्रमिला आमले यांच्याही बाबतीत असेच घडले. कृष्णराज महाडिक यांनी, चक्क त्यांचा मागोवा घेत, घर गाठले आणि त्यांना सोन्याचे नाणे आणि साडी बहाल केली. त्यामुळं आमले परिवारही भारावून गेला होता. कृष्णराज महाडिक यांनी, दसर्‍यादिवशी खरोखरचे सोने देवून, या कुटुंबांबद्दल जी आस्था आणि आपुलकी दाखवली, दातृत्वाचे दर्शन घडवले, ते पाहील्यानंतर माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी याचे यथार्थ दर्शन झाले.