स्वराज्य फौंडेशन, फ्रेंडशिप ग्रुप, टेम्पो युनियन वाशी नाका यांच्यातर्फे वारकऱ्यांना राजीगरा लाडू, पाणी वाटप
schedule08 Jul 25 person by visibility 198 categoryसामाजिक

कोल्हापूर : आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या नंदवाळ येथे जात असताना नवीन वाशी नाका कोल्हापूर येथे पायी चालत जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना स्वराज्य फौंडेशन आणि फ्रेंडशिप ग्रुप तसेच टेम्पो युनियन वाशी नाका यांच्या माध्यमातून राजीगरा लाडू आणि पाणी वाटप करण्यात आले.
गेली 11 वर्ष ही सेवा अगदी निस्वार्थी भावनेने चालू आहे. त्यावेळी विन्मय काजवडेकर, उत्तम कारंडे, संदीप मेटील, अक्षय कोकणे, महेश सावंत, मिलिंद सामंत, अरविंद कांबळे, मयूर कांबळे, योगेश गायकवाड, संजय कदम,
सचिन बामणीकर, युवराज पोवार, देवाप्पा शिंदे, साताप्पा पाटील, संतोष काळे, अमित लाड,सुरेश राठोड,शंकर पोवार, विकास पाटील,स्वरा पोवार, शिवण्या कारंडे, शरण्या पोवार, राजनंदिनी पोवार टेम्पो युनियन नवीन वाशी नाक्याचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.