कुरुंदवाड येथे तरुणाचा खून; अज्ञात आरोपी फरारी
schedule07 Jul 25 person by visibility 276 categoryगुन्हे

कुरुंदवाड: एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरुन तीन अज्ञात हल्लेखोरांनी अक्षय दिपक चव्हाण (वय २६) या तरुणाचा खून केला. रविवारी (दि.७) मध्यरात्रीच्या सुमारास माळ भागावरील एका हॉटेलसमोर ही घटना घडली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अक्षय चव्हाण आणि अज्ञात तिघा आरोपी यांच्यात एकमेकांकडे 'खुन्नस' नजरेने पाहण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्या तिघा संशयितांनी अक्षयवर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले. अक्षयला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
खुनाची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अज्ञात आरोपी फरारी असून त्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाली आहेत.