SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेवरील पुस्तक उपलब्ध; डॉ. सयाजी हांडे, विनीत गुप्ता, डॉ. सोमनाथ पवार सहलेखकसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाचा उन्हाळी परीक्षा निकाल उच्चंकितडीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमाचा एमएसबीटीई परिक्षेत उच्चांकी निकालस्वराज्य फौंडेशन, फ्रेंडशिप ग्रुप, टेम्पो युनियन वाशी नाका यांच्यातर्फे वारकऱ्यांना राजीगरा लाडू, पाणी वाटपराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत विधीमंडळात चर्चानवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी : आमदार सतेज पाटील यांचा सवालसुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 31 जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहनविधानसभा लक्षवेधी सूचना : राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच 'मेगा भरती' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘गोकुळ’च्या वासरू संगोपनातून दुग्ध व्यवसायास नवे बळ : नविद मुश्रीफकुरुंदवाड येथे तरुणाचा खून; अज्ञात आरोपी फरारी

जाहिरात

 

पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत एक महिन्याच्या आत बैठक : मंत्री शंभूराज देसाई

schedule07 Jul 25 person by visibility 219 categoryराज्य

मुंबई : पीएमजीपी (प्रधानमंत्री गृह प्रकल्प) योजनेतील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत येत्या एक महिन्याच्या आत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत लोकप्रतिनिधी समितीचे सदस्य आणि म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती, मंत्री शंभूराज देसाई विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य हरीश पिंपळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य अमीन पटेल योगेश सागर, ज्योती गायकवाड यांनीही उपप्रश्न उपस्थित केला.

मंत्री देसाई म्हणाले, उमरखाडी पुनर्वसन समितीच्या वतीने समूह पुनर्विकास प्रकल्पाबाबत प्रस्ताव सादर केला होता. मात्र, या प्रस्तावासोबत खासगी मालकांची आवश्यक संमती सादर करण्यात आली नव्हती. त्यामुळे खासगी मालकांच्या इमारतींचा समावेश समूह पुनर्विकास योजनेमध्ये करणे शक्य नसल्याचे मंडळाने त्यांना कळविले होते. त्यानंतरही उमरखाडी पुनर्वसन समितीने एकूण ८१ इमारतींच्या समावेशासह सुधारित प्रस्ताव ३ डिसेंबर २०२४ रोजी म्हाडा प्राधिकरणाकडे सादर केला आहे.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रकल्पाची व्यवहार्यता पुन्हा एकदा तपासण्याचे काम सुरू करण्यात आले असून, यासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित वास्तुविशारदाकडून सादर होणाऱ्या अहवालाच्या आधारे, समूह पुनर्विकासाबाबतची पुढील कार्यवाही म्हाडामार्फत करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या इमारतींपैकी ३७ म्हाडाच्या मालकीच्या असून उर्वरित ४४ इमारती खासगी जमिनींवरील आहेत. या सर्व इमारतींचा क्लस्टर करून पुनर्विकास करण्याचे नियोजन आहे. मात्र, खासगी मालकांची आवश्यक संमती मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर नवीन पर्यायांचा विचार करण्यासाठी वित्तीय आणि तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes