आय.डी.बी.आय. बँक ऑफ महाराष्ट्र व बँक ऑफ बडौंदा यांच्याकडून कर्मचाऱ्यांसाठी गमबुट, रेनकोट
schedule07 Jul 25 person by visibility 687 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन आय.डी.बी.आय.बँक, बँक ऑफ महाराष्ट्र व बँक ऑफ बडौंदा यांनी त्यांचे सीएसआर फंडाद्वारे गमबुट व रेनकोट आज दिले. महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना हे साहित्य देण्यात येणार आहे. या बँकांनी मिळून साधारणत: 3 लाख 50 हजार रुपयांचे हे साहित्य सीएसआर फंड द्वारे दिले आहे. हे साहित्य महापालिकेकडे आज सकाळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे आय.डी.बी.आय.बँक, बँक ऑफ महाराष्ट्र व बँक ऑफ बडौंदा या बँकांच्या प्रतिनिधींनी यांनी सुपूर्त केले.
यावेळी प्राथमिक स्वरुपात प्रशासक के.मंजूलक्ष्मी व व अतिरिक्त आयुक्त राहुल रोडके यांच्या हस्ते महिला व पुरूष कर्मचाऱ्यांना गमबुट व रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यावेळी आय.डी.बी.आय बँकेचे जनरल मॅनेजर विक्रांत भिडे, ब्रँच हेड स्वामी सर, राजाराम कोठावळे, बँक ऑफ बडौंदाचे जनरल मॅनेजर निरज कुमार पांडे, दिक्षेस शहा, विनायक पोवार, सुर्यकांत काळे, प्रशांत चावरे, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, भांडार अधिक्षक सौ.प्रिती घाटोळे, कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष काका चरापले, जनरल सेक्रेटरी अजित तिवले उपस्थित होते.