घुणकी ग्रामपंचायत विरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन!
schedule24 Dec 25 person by visibility 119 categoryसामाजिक
घुणकी : येथील प्रशासन म्हणून भूमिका बजावणारी ग्रामपंचायत ही मनमानी कारभार करत असल्याचे तसेच गावातील विकासाबाबत पूर्णपणे उदासीन असल्याचा आरोप करत स्थानिक काही माजी आजी लोकप्रतिनिधी आणि तरुण वर्गानी एकदिवसीय धरणे आंदोलन केले .
एखाद्या गेंड्याच्या कातडी सारखे हे प्रशासन काम करत असल्याचा आरोप जय मल्हार सेनेचे युवा जिल्हा अध्यक्ष, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( शरदचंद्र पवार गटाचे ) शहाजी सिद यांनी केला आहे. तसेच माजी उपसरपंच अशोक जाधव यांनी गावात किती निधी येतो कसा त्याचा वापर केला पाहिजे. यातील काहीच या ग्रामपंचायतमध्ये होताना दिसत नाही असा आरोप केला. तसेच आता पर्यंत अनेक ग्रामसभा झाल्या पण ठोस काहीच होताना दिसत नाही असेही ते पुढे म्हणाले. हे आंदोलन राजकीय नसून नागरिकांचा आक्रोश आहे. तसेच थकबाकी 50% सवलत असुदे किंवा गावातील विकासाचे अनेक प्रश्न असुदे. नागरिकांची घोर निराशा असा ही आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय बुड्डे यांनी केला.
यावेळी गावातील विकासासाठी गावातील प्रत्येक तरुण पुढे असणार व गावातील प्रत्येक तरुण आता ग्रामपंचायत प्रशासन विभागाला जाब विचारणार आता प्रशासनाने ठरवायचं आहे की या गावाचा विकास कसा करायचा असे पृथ्वीराज पाटील म्हणाले,
यावेळी या एकदिवसीय आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी युवा क्रांती आघाडीचे प्रमुख शहाजी सिद, वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते, वारणा बँकेचे संचालक धोंडीराम सिद, ग्राम सदस्य रमेश पाटोळे, शिवाजी पाटोळे, संजय बुड्डे, तंटामुक्त समिती उपअध्यक्ष सचिन सिद, युवा नेतृत्व पृथ्वीराज पाटील, शिवाजी जाधव ( चेअरमन ) शिवसेना ( उबाठा गट) शाखा अध्यक्ष जालिंदर जाधव, जयसिंग काशिद, अरुण कांबळे, अण्णा सिद, दिलीप पवार,अरुण कांबळे, बाळासाहेब शिंदे, रघुनाथ पाटील, हंबीरराव पाटील, सर्पमित्र उमेश मगदूम, शेतकरी संघटनेचे जयसिंग कुरणे, सुधीर मगदूम, आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते.





