डीकेटीई मध्ये इंटीग्रेटींग एआय ॲण्ड एमएल फॉर सस्टेनेबल इलेक्ट्रीक व्हेईकल डेव्हलपमेंट ॲण्ड स्मार्ट मोबॅलिटी विषयावार एफडीपीचे आयोजन
schedule05 Jan 26 person by visibility 132 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : येथील डीकेटीई इन्स्टिटयूटमध्ये दि.०५ ते १० जानेवारी २०२६ पर्यंत, अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट पोग्रॅम (एफडीपी) डीकेटीई इलेक्ट्रीकल विभागामार्फत इंटीग्रेटींग एआय ॲण्ड एमएल फॉर सस्टेनेबल इलेक्ट्रीक व्हेईकल डेव्हलपमेंट ॲण्ड स्मार्ट मोबॅलिटी या विषयावर सहा दिवसाची ऑनलाईन एफडीपी आयोजित केलेली आहे.
या एफडीपी मध्ये कृत्रिम बुध्दिमता (एआय) व मशिन लर्निंग (एमएल) तंत्रज्ञानाचा शाश्वत विदयुत वाहन विकास व स्मार्ट मोबॅलिटी क्षेत्रातील उपयोग, सद्यःस्थिती व भविष्यातील संधी यावर तज्ञांकडून सखोल मार्गदर्शन व व्याख्याने होणार आहेत. या उपक्रमामुळे अध्यापकांच्या संशोधन व अध्यापन कौशलयांना नवे परिमाण मिळणार आहे.
हा कार्यक्रम अटल फॅकल्टी डेवहलपमेंट पोग्रॅमद्वारे आहे. अटल एफडीपी हा एक मोठया संख्येतील निवडक प्रोग्रॅम मध्ये आहे, ज्यात प्राध्यपकांना संबोधित करण्यासाठी आयआयटी, एनआयटी, आयआयएससी, इंडस्ट्री एक्सपर्ट तसेच परदेशातील प्रतिष्टित शिक्षणतज्ञ संशोधक आमंत्रित केले आहे. तरी इच्छुक प्राध्यपकांनी या ऑनलाईन अटल एफडीपी मध्ये उपस्थित राहून त्याचे ज्ञान व कौशल्य वाढविण्याचे अवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, डायरेक्टर प्रा. डॉ. एल.एस. अडमुठे व इलेक्ट्रीकल विभागप्रमुख डॉ आर.एन. पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. सदर एफडीपीचे समन्वयक म्हणून प्रा.डॉ. व्ही. बी. मगदूम, प्रा.पी. एस. मगदूम हे काम पाहत आहेत.

