सैन्य दलामध्ये मोफत प्रशिक्षणासाठी आता 15 ऐवजी 13 जानेवारीस मुलाखत
schedule06 Jan 26 person by visibility 114 categoryसामाजिक
कोल्हापूर : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंम्बाईनड डिफेन्स सर्व्हिस (CDS) परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी 19 जानेवारी ते 3 एप्रिल या कालावधीत CDS कोर्स क्र. 66 आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे 15 जानेवारी ऐवजी 13 जानेवारी रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे.
असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले.कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले.