SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत 'शाहिरी बाणा' कार्यक्रमओंकार जाधव यांच्या प्रचारार्थ सिरत मोहल्ला परिसरामध्ये प्रचार फेरीमहायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा जयघोष, शेकडो समर्थकांच्या सहभागाने सत्यजित जाधव यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फेरी, खासदार धनंजय महाडिक यांचा सहभागगजेंद्र प्रतिष्ठानकडून विद्यापीठास आबा देशपांडे यांच्या स्मरणार्थ देणगीडिजिटल युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ई-कन्टेन्ट अपरिहार्य ; अभिजित रेडेकरवंचितांच्या जगण्याचा इतिहास सामोरा यावा ; प्रा. ज्ञानेंद्र पांडेयसंजय घोडावत इन्स्टिट्यूट, डिप्लोमा इंजिनिअरिंग “हिवाळी परीक्षेत उच्चांकित निकालाची परंपरा कायम”प्रभाग क्रमांक 11 मधील सत्यजीत जाधव यांच्या प्रचारार्थ सिद्धाळा, टिंबर मार्केट परिसरात प्रचार फेरीसन्मान योजनेसह शासन दरबारी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठवणार ; आमदार सतेज पाटील यांची ग्वाही भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीची तयारी सुरू, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून आजमावली मते

जाहिरात

 

भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीची तयारी सुरू, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून आजमावली मते

schedule06 Jan 26 person by visibility 191 categoryराजकीय

कोल्हापूर  : महापालिका निवडणूकीची प्रक्रिया ऐनभरात आली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तर दुसरीकडे कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होवू शकते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू  झाल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी, पक्षाकडे ६५० पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण कराव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने, राज्य निवडणूक आयोगाची धावपळ उडाली आहे. राज्यातील २९ महापालिका निवडणूकांची प्रक्रिया १६ जानेवारी रोजी मतमोजणीने पूर्ण होईल. दुसरीकडे पुढील दोन दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीची तयारी सुरू झाली आहे. भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातर्ंगत येणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती ३ दिवस चालणार आहेत.

 आज कागल, राधानगरी, भुदरगड विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. संपूर्ण जिल्हयातून ६५० पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  सर्व इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर, त्याबद्दलचा अहवाल राज्यस्तरीय नेत्यांकडे पाठवण्यात येईल आणि उमेदवारीचा अंतिम निर्णय होईल, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. बुधवारी कोल्हापूर दक्षिण, करवीर, पन्हाळा, गगनबावडा तर गुरूवारी आजरा, गडहिंग्लज, चंदगड या भागातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह माजी आमदार संजयबाबा घाटगे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महेश जाधव हे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes