SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी तातडीने द्या; खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय मंत्र्यांकडे आक्रमक मागणीकोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची तडकाफडकी बदली; मंत्रालयात हजर होण्याचे 'एकतर्फी' आदेश'राष्ट्रवादी'मध्ये कोणताही संघर्ष नाही; महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आमचाच दावा : मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा डावा कालव्यातील नादुरुस्त गेट दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण होणार‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरीअवैध प्रवासी वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कडक भूमिका घेणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकअधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी २ ते ८ एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ तृतीययशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटसाठी शासनाकडून ९ कोटींच्या बांधकामास प्रशासकीय मान्यताकोल्हापुरात 'पुनर्चक्रीकरणाची भिंत' उपक्रम; कचरामुक्त शहरासाठी 'अवनी'चा पुढाकार

जाहिरात

 

'राष्ट्रवादी'मध्ये कोणताही संघर्ष नाही; महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आमचाच दावा : मंत्री हसन मुश्रीफ

schedule02 Apr 26 person by visibility 86 categoryराजकीय

कोल्हापूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या चर्चा आणि पक्षांतर्गत वादावर आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले. रूपाली चाकणकर यांच्यानंतर या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच (अजित पवार गट) दावा कायम असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असून पक्षामध्ये कोणतेही छोटे-मोठे मतभेद असल्यास ते चर्चेतून सोडवले जातील. सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष सक्षमपणे वाटचाल करत असून, आगामी काळात संघटनात्मक बांधणीवर अधिक भर दिला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी स्थानिक राजकारणावरही भाष्य केले. विशेषतः 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका त्यांनी मांडली. तसेच निवडणूक बिनविरोध बाबत बोलताना अजून मतदार यादीत फायनल झाल्यामुळे आताच याविषयी जास्त बोलणे संयुक्तिक ठरणार नाही असे त्यांनी सांगितले. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी समन्वय असून पक्षहितासाठी सर्वजण एकत्र काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

या पत्रकार परिषदेमुळे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes