SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम: गगनबावाड्यात सर्वाधिक पाऊस, पंचगंगा नदीची पातळी इशारा पातळीच्या खालीस्वराज्याचा हुंकार: लोकमान्य बाळ गंगाधर टिळकडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला 'अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय' दर्जास्व. अजितदादा पवार यांना गोकुळ तर्फे अभिवादनकंदलगाव हादरले! शेतवाडीत ४५ वर्षीय इसमाचा गळा आवळून निर्घृण खून; कोल्हापुरात खळबळकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वोत्कृष्ठ पुरस्कार जाहीरसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ. सचिन कांबळे यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकपेपर लीक प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी!डी. वाय. पाटील अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या ७२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवडसिंधुदुर्गातून ‘गोकुळ’चे एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम: गगनबावाड्यात सर्वाधिक पाऊस, पंचगंगा नदीची पातळी इशारा पातळीच्या खाली

schedule23 Jul 26 person by visibility 87 categoryराज्य

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर अद्यापही कायम असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दिनांक २३ जुलै २०२६ रोजीच्या सकाळी १०:०० वाजेच्या अहवालानुसार जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जून २०२६ पासून आजअखेर गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १५५५.९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, संपूर्ण जिल्ह्याचा सरासरी पाऊस ३०.४ मि.मी. इतका नोंदवला गेला आहे.

जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणीपातळी ३१ फूट ८ इंच इतकी आहे, जी इशारा पातळीच्या (३९ फूट) खाली आहे. तसेच शिरोळ बंधाऱ्याजवळ ३८.८ फूट आणि नृसिंहवाडी येथे ३४.९ फूट पाणीपातळी नोंदवली गेली आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील एकूण २९९ बंधाऱ्यांपैकी २५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

 वाहतुकीच्या दृष्टीने काही मार्ग बंद असले तरी सर्व ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले असून रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरळीत आहे.
प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत असून राधानगरी धरणात ८५% (६.६१ टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे व या धरणातून १४०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे, तसेच याचे स्वयंचलित सर्व दरवाजे बंद आहेत. तुळशी धरणात ६६%

वारणेत ६९% तर दूधगंगा धरणात ४४% पाणीसाठा आहे. दरम्यान, पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी आजअखेर एकूण १३,६९,०५,००/- रुपयांच्या अंदाजित नुकसानीची नोंद करण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes