गोवा येथे 27 जानेवारी रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन
schedule05 Jan 26 person by visibility 137 categoryसामाजिक
कोल्हापूर : पोस्टल पेन्शनधारकांच्या / कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन, पणजीव्दारे पेंशन अदालत मंगळवार, 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन, पणजी-403001 येथे आयोजित केली आहे. (गोवा राज्य, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश आहे.)
निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे./टपाल विभागाचे निवृत्ती वेतनधारक ज्यांचे 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल.
पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे जसे की वारसा प्रमाणपत्र आणि धोरणात्मक बाबींसह प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्ती वेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपले अर्ज, महेश एन., वरिष्ठ लेखा अधिकारी/सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्तर जनरल कार्यालय, गोवा रिजन, पणजी-403001 यांचे नावे 15 जानेवारी किंवा यापूर्वी ई-मेल आयडी (accts.goa@indiapost.gov.in) पाठवू शकता. 15 जानेवारी नंतर मिळालेल्या अर्जावर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभागामार्फत करण्यात आले.

